शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

एकसारख्या क्रमांकाच्या पावत्या देऊन गैरव्यवहार

By admin | Updated: October 25, 2016 00:56 IST

येथे कार्यरत असलेले ग्राम विकास अधिकारी यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात सारख्याच बुक क्रमांकाच्या..

ग्रा. पं. सदस्यांचा आरोप : दोन पावती बुक गहाळवैरागड : येथे कार्यरत असलेले ग्राम विकास अधिकारी यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात सारख्याच बुक क्रमांकाच्या व सारख्या पावती क्रमांकाच्या तीन पावत्या वेगवेगळ्या व्यक्तींना देऊन रक्कम हडप केली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून ग्राम विकास अधिकारी डाखरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग बावणकर, वसुधा तावेडे यांनी केली आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षातील दोन पावती बूक डाखरे यांनी गहाळ करून लाखो रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. हा गैरव्यवहार लक्षात येऊ नये म्हणून नमूना ७, सामान्य पावती बुक वापरून एकाच बुकातील सारख्या नंबरच्या पावत्या वेगवेगळ्या व्यक्तींना दिल्या आहेत. बुक क्रमांक १ मधील क्रमांक ३ ची पावती ज्ञानेश्वर खोब्राजी पडघन यांना विद्युत नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ४०० रूपये नगदी घेऊन देण्यात आली आहे. बुक क्रमांक १ असे लिहिलेली नंबर ३ चीच पावती चिन्मय चित्तरंजन साना यांना हातपंप खोदण्यासाठी परवानगी देण्यासाठी ४०० रूपये नगदी घेऊन देण्यात आली आहे. तर याच क्रमांकाची तिसरी पावती गोरजाई माता यांनी ६ हजार रूपये जमा केले आहेत. त्यासाठी देण्यात आले आहेत. एकच पावती बुक, एकच पावती क्रमांक वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वापरून ग्रामविकास अधिकारी डाखरे यांनी लाखो रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. दोन पावती बुक गहाळ झाले असल्याचे चौकशीत सुद्धा स्पष्ट झाले आहे, असा आरोप केला आहे. मागास क्षेत्र अनुदान निधीअंतर्गत येथील जिल्हा परिषद शाळेतील संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले. १२९ मीटर लांबीच्या संरक्षण भिंतीसाठी जास्तीत जास्त २० हजार विटा लागतात. मात्र या बांधकामात ३२ हजार विटा वापरल्याचे बिल जोडण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची तक्रार करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून ग्रामविकास अधिकारी डाखरे यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग बावनकर, वसुधा तावेडे यांनी केली आहे. (वार्ताहर)