धानाेरा-गडचिराेली मार्गावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:38 IST2021-09-03T04:38:09+5:302021-09-03T04:38:09+5:30

लेख-मेंढा गावाजवळ आजपर्यंत २ ते ३ अपघात घडले आहेत. सध्या पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने वाहन चालकांना वाहन ...

Deadly pits on Dhanera-Gadchiraeli road | धानाेरा-गडचिराेली मार्गावर जीवघेणे खड्डे

धानाेरा-गडचिराेली मार्गावर जीवघेणे खड्डे

लेख-मेंढा गावाजवळ आजपर्यंत २ ते ३ अपघात घडले आहेत. सध्या पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने वाहन चालकांना वाहन चालवितांना अंदाज येत नाही. वाहनांचे संतुलन बिघडून अपघात होऊन अनेक नागरिक जखमी झाले आहेत. २ ते ३ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. परंतु याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे, या विभागाचे अधिकारी याच मार्गाने गडचिरोलीवरून धानोरा येथे अप-डाऊन करतात. परंतु त्यांना हे खड्डे दिसत नाहीत काय? असा सवालही पदाधिकाऱ्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या परिस्थितीचा विचार करून या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य लेनगुरे यांनी केली आहे. याशिवाय त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनाही निवेदन दिले आहे.

010921\5354img-20210901-wa0035.jpg

लेखा गावाजवळील खड्डे दाखवताना जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे

Web Title: Deadly pits on Dhanera-Gadchiraeli road