शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जारेगुडावासीयांचा नदीतून धोकादायक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

भामरागड लगत वाहत असलेल्या पामुलगौतम नदीच्या पलिकडे जारेगुडा, गोलागुडा ही गावे आहेत. येथील बहुतांश नागरिक मासेमारीचा व्यवसाय करतात. मासे विकण्यासोबतच इतर कामांसाठी येथील नागरिकांना तालुकास्थळ असलेले भामरागड गाठावे लागते. जारेगुडा ते भामरागड या दोन गावांच्या दरम्यान केवळ एक किमी अंतर आहे. मात्र या दोन गावांमध्ये पामुलगौतम नदी वाहते.

ठळक मुद्देपामुलगौतम नदी ओलांडून पोहोचावे लागते भामरागडला; पावसाळ्यात दुर्घटना होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : जारेगुडा व गोलागुडातील गावकऱ्यांना विविध कामांसाठी भामरागड येथे यावे लागते. यासाठी पामुलगौतम नदी ओलांडावी लागते. पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली राहत असल्याने नावेच्या माध्यमातून भामरागड गाठावे लागते. हा धोकादायक प्रवास वर्षभर करावा लागत असल्याने या ठिकाणी लोखंडी पूल बांधण्याची मागणी आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.भामरागड लगत वाहत असलेल्या पामुलगौतम नदीच्या पलिकडे जारेगुडा, गोलागुडा ही गावे आहेत. येथील बहुतांश नागरिक मासेमारीचा व्यवसाय करतात. मासे विकण्यासोबतच इतर कामांसाठी येथील नागरिकांना तालुकास्थळ असलेले भामरागड गाठावे लागते. जारेगुडा ते भामरागड या दोन गावांच्या दरम्यान केवळ एक किमी अंतर आहे. मात्र या दोन गावांमध्ये पामुलगौतम नदी वाहते. धोडराज मार्गे भामरागडला येता येते. मात्र यासाठी १५ किमीचा फेरा होते. एवढा फेरा मारून भामरागड गाठायचे म्हटल्यास दिवसभराची मोलमजुरी जाते. त्यामुळे बहुतांश नागरिक पामुलगौतम नदीतून डोंग्याने प्रवास करतात. पावसाळ्यात नदी भरली राहत असताना डोंग्याचा प्रवास धोकादायक राहते. जिल्ह्यात डोंगा उलटून जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, जोरेगुडावासीयांचे नाव आकाराने अतिशय लहान आहे. त्यामुळे ही नाव उलटण्याची सर्वाधिक भिती राहते. तरीही नागरिक या नावेने प्रवास करतात.पूल उभारण्याची मागणीभामरागड हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील आदिवासी नागरिकांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होते. हा निधी खर्च झाल्याचेही दाखविले जाते. मात्र गावांमध्ये विकास कामे दिसत नाही. परिणामी निधी जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जोरेगुडा व गोलागुडा येथील विद्यार्थी सुध्दा भामरागड येथे शिकण्यासाठी येतात. येथील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन शासनाने लहान पूल बांधून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. मात्र अजूनपर्यंत कार्यवाही झाली नाही.

टॅग्स :riverनदी