शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीतही शेती मशागतीची कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:37 IST

दिनांक १४ मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास वादळ व मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील व ग्रामीण भागातील ...

दिनांक १४ मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास वादळ व मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील व ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात ट्रॅक्‍टरने नांगरणी करताना शेताच्या बांधावर दिसून येत आहेत. नांगरणीचे प्रतितास आठशे रुपये भाडे आकारले जात आहेत.

कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. दिवसेंदिवस मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील काही शेतकरी गेल्या काही दिवसांपासून ट्रॅक्‍टरच्या साह्याने शेताची नांगरणी, बांधाची दुरुस्ती करणे, सपाटीकरण करणे, शेतजमीन समांतर करणे आदी कामे करीत आहेत. शिवाय काही शेतकरी व त्यांचे कुटुंबीय सकाळपासून शेतीमधील वाळलेले गवत काढत असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील बरेच शेतकरी व शेतमजूर दरवर्षी तेंदू संकलनाचे काम करतात. यावर्षीसुद्धा काही दिवस तेंदू संकलनाचे काम केले. लवकरच तेंदूपत्ता संकलनाचे काम बंद पडेल. कोरोनाच्या संचारबंदीमुळे इतर सर्वच कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे रिकाम्या हाताने राहायचे कसे, असा विचार करून बरेच शेतकरी व त्यांचे कुटुंबीय शेतात जाऊन शेती मशागतीचे काम करीत आहेत. उन्हाचा पारा वाढल्यामुळे ही कामे अगदी सकाळच्या सुमारास करण्यावर अधिक भर दिला जात आहे.

===Photopath===

180521\img_20210517_174647.jpg

===Caption===

ट्रॅक्टर द्वारे शेताची नांगरणी