खरिपाच्या शेतीकामाला आला वेग

By Admin | Updated: June 17, 2015 02:33 IST2015-06-17T02:33:03+5:302015-06-17T02:33:03+5:30

खरीप हंगामाला आता सुरुवात झाली आहे. धान हे गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. शेतकरी शेतीकामाला जोमाने लागला आहे.

The cultivation of Kharipa comes from the top | खरिपाच्या शेतीकामाला आला वेग

खरिपाच्या शेतीकामाला आला वेग

खरिपाच्या शेतीकामाला आला वेग
खरीप हंगामाला आता सुरुवात झाली आहे. धान हे गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. शेतकरी शेतीकामाला जोमाने लागला आहे. शेतीची नांगरणी, शेतातील कचरा वेचणी, पाळीची दुरूस्ती तसेच शेणखत टाकणे, शेतातील काटेरी वनस्पती तोडणे आदी काम शेतकरी महिला मजुरांच्या मार्फत करीत आहेत. आरमोरी तालुक्यात काही भागात हळदही लावली जाते. हळद शेतीसाठी वाफे तयार करण्याचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे. सध्या पावसाचे समाधानकारक आगमन न झाल्याने बियाणे, खतांची खरेदी अद्याप शेतकऱ्यांनी प्रारंभ केलेली नाही.

Web Title: The cultivation of Kharipa comes from the top