शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

ऋषिपंचमीनिमित्त मार्कंडात उसळली भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:48 AM

आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सात्विकतेला, त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे. ज्ञान, विज्ञान व पुराणे यांची दीक्षा देण्याचे काम ऋषीमुनी फार पूर्वीपासून करीत होते. ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणला जातो.

ठळक मुद्देमहिलांची लक्षणिय हजेरी : वैनगंगा नदी तिरावर पवित्र स्नान

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे ऋषीपंचमीनिमित्त ३ सप्टेंबर रोजी मंगळवारला महामृत्यूंजय मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी तसेच पूजाअर्चा करण्याकरिता महिला भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. परिणामी मार्र्कंडादेव येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मार्र्कंडादेव येथे उत्तरवाहिनी झालेल्या वैनगंगा नदीच्या तिरावर स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.महाशिवरात्री, श्रावणमास यासह वर्षभर मार्र्कंडादेव येथे विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे येथे वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. गणेश चुतर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे, भाद्रपद शुध्द पंचमीला अर्थातच ऋषीपंचमीला महिला हे व्रत करीत असतात. आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सात्विकतेला, त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे. ज्ञान, विज्ञान व पुराणे यांची दीक्षा देण्याचे काम ऋषीमुनी फार पूर्वीपासून करीत होते. ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणला जातो. अशा थोर ऋषींच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला श्रावणमासात व्रत ठेवत असतात. ऋषी पंचमीनिमित्त सप्तऋषींची उपवासना करून उपवास करावा, अशी आख्यायिका आहे.अशा या ऋषीपंचमीनिमित्त मंगळवारी महिला भाविक मोठ्या संख्येने मार्र्कंडेश्वराच्या मंदिरात दाखल झाल्या होत्या, अशी माहिती येथील पुजारी अरूण गायकवाड महाराज, रूपेश गायकवाड महाराज यांनी लोकमतशी बोलताना दिली. मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने येथे भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहे. चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वतीने वैनगंगा नदी तिरावर तसेच मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आजदिवसभर पाऊस असल्याने प्रशासनाकडून मार्र्कंडादेव येथे सोयीसुविधा व सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेतली जात होती.

टॅग्स :Templeमंदिर