शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांची गर्दी

By admin | Updated: December 27, 2016 01:58 IST

महावितरणच्या वतीने घरगुती, औद्योगिक, वाणिज्यीक थकबाकीदार ग्राहकांविरोधात वीज पुरवठा खंडीत

सुट्यांचा परिणाम : महावितरणच्या वीज कपातीची ग्राहकांनी घेतली धास्ती गडचिरोली : महावितरणच्या वतीने घरगुती, औद्योगिक, वाणिज्यीक थकबाकीदार ग्राहकांविरोधात वीज पुरवठा खंडीत करण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईची धास्ती घेऊन गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्हाभरातील वीज ग्राहक वीज देयकाचा भरणा करण्यासाठी स्वीकृती केंद्रावर गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावरील महावितरण कार्यालयात वीज बिल स्वीकृती केंद्र आहे. या केंद्रावर सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी ८ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत वीज बिलाची रक्कम स्वीकारली जाते. तसेच महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारला स्वीकृती केंद्र बंद ठेवण्यात येते. गडचिरोली शहराची लोकसंख्या वाढली असून वीज ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गडचिरोली शहराच्या बाराही प्रभागात वीज बिल ग्राहकांच्या घरी पोहोचविण्यासाठी बराच विलंब होतो. त्यामुळे वीज ग्राहकांना वीज देयकाचा भरणा करण्यासाठी धावपळ करावी लागते. शनिवार व रविवारी सलग सुट्या आल्याने २६ डिसेंबर रोजी सोमवारला वीज देयकाचा भरणा करण्यासाठी गडचिरोली शहरातील वीज ग्राहकांनी चामोर्शी मार्गावरील स्वीकृती केंद्रावर दुपारी ११.३० ते १२.३० वाजताच्या सुमारास गर्दी केली होती. (स्थानिक प्रतिनिधी) आॅनलाईन वीज बिल भरण्यास अल्प प्रतिसाद ४वीज ग्राहकांना घरबसल्या वीज बिलाचा भरणा करता यावा, तसेच त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी महावितरणने आॅनलाईन वीज बिल भरण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आॅनलाईन पध्दतीने वीज बिल भरण्याच्या प्रक्रियेला वीज ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. आजही अनेक वीज ग्राहक स्वीकृती केंद्रावर जाऊन वीज बिलाचा भरणा करीत असल्याचे दिसून येते. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक आॅनलाईन प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत.