शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोर्लाच्या माजी उपसरपंचावर फौजदारी कारवाई प्रलंबितच

By admin | Updated: June 28, 2015 02:21 IST

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत पोर्ला येथील ग्रामपंचायतीमार्फत पोर्लाचे माजी उपसरपंच बापू फरांडे यांनी २०१२-१३ या वर्षात घरकूल योजनेचा लाभ घेतला.

गडचिरोली : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत पोर्ला येथील ग्रामपंचायतीमार्फत पोर्लाचे माजी उपसरपंच बापू फरांडे यांनी २०१२-१३ या वर्षात घरकूल योजनेचा लाभ घेतला. घरकुलाचे बांधकाम न करता त्यांनी ग्रामपंचायतीकडून ५० हजार रूपयांच्या धनादेशाची उचल केली. या संदर्भात आपण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे तक्रार केल्यानंतर चौकशी करण्यात आली. मात्र त्यांच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे बांधकाम न करता घरकुलाचे अनुदान लाटल्या प्रकरणी फरांडे यांना प्रशासनाकडून अभय मिळत आहे, असा आरोप पोर्ला येथील अण्णा हजारे विचारमंचचे कार्यकर्त विश्वनाथ म्हशाखेत्री यांनी केला आहे. या संदर्भात म्हशाखेत्री यांनी लोकमतकडे कागदपत्रासह माहिती देताना सांगितले की, इंदिरा आवास योजनेंतर्गत २०१२-१३ या वर्षात पोर्ला ग्रामपंचायतीमार्फत माजी उपसरपंच बापू फरांडे यांना ६८ हजार रूपये किमतीचे घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र कोणत्याही प्रकारचे काम न करता ग्रा.पं.कडून प्रथम २५ हजार व दुसऱ्यांदा २५ असे एकूण ५० हजार रूपयांची धनादेशाद्वारे फरांडे यांनी उचल केली. तक्रारीनंतर २८ आॅगस्ट २०१४ रोजी घरकूल बांधकामाचा पंचनामा व चौकशी करण्यात आली. यावेळी अपूर्ण स्थितीत घरकूल बांधकाम आढळून आले. घरकूल बांधकाम अपूर्ण असताना ग्रा.पं. प्रशासनाने फरांडे यांना ५० हजार रूपयांचा धनादेश कसा काय दिला, असा सवालही म्हशाखेत्री यांनी उपस्थित केला आहे. पोर्ला ग्रामपंचायती अंतर्गत घरकुलाच्या नियमबाह्य निधी वाटपाबाबत आपण माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितली. या तत्कालीन ग्रामसेवक यांनी कोणत्याही प्रकारची मोक्का चौकशी तसेच बांधकामाची पाहणी न करता घरकूल बांधकामाचे खोटे मुल्यांकन करून बापू फरांडे यांना १८ एप्रिल २०१४ रोजी अनुदानाच्या रक्कमेचा धनादेश प्रदान केला. असेही म्हशाखेत्री यांनी लोकमतला सांगितले. मोठ्या प्रमाणात घरकूल घोटाळा होऊनही ग्राम पंचायत, पंचायत समिती व जि.प. प्रशासन कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. बांधकाम न करता घरकुलाचे अनुदान लाटणाऱ्या बापू फरांडे यांच्यावर तत्काळ फौजदारी कारवाई करावी तसेच त्यांना देण्यात आलेल्या ५० हजार रूपये घरकुलाची रक्कम प्रशासनाने परत घ्यावी, अशी मागणी म्हशाखेत्री यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)