शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
3
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
4
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
7
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
8
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
9
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
10
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
11
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
12
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
13
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
14
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
15
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
16
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
17
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
18
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
19
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
20
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक व कार्यशाळेसाठी बृहत् आराखडा तयार करा

By admin | Updated: June 19, 2016 01:10 IST

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक परिवहन व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून अधिकाधिक मार्गावरून राज्य परिवहन महामंडळाने बसेस सोडाव्यात

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : बससेवेचा घेतला आढावागडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक परिवहन व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून अधिकाधिक मार्गावरून राज्य परिवहन महामंडळाने बसेस सोडाव्यात तसेच बसस्थानके व कार्यशाळा यांचा बृहत् आराखडा तयार करून त्याच्या उभारणीचा पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे परिवहन यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याबाबत कळविले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी सर्व संबंधितांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. टी. फासे, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील यादीवर असलेल्या १ हजार ५९ गावांमध्ये महामंडळाची बस पोहोचण्याच्या दृष्टीकोणातून कामकाज सुरू आहे. बांधकाम विभागाच्या माहितीनुसार एकूण ४५६ ग्रामपंचायतीत ६७ गावांना जोडणारे रस्ते नाही. मात्र बारमाही संपर्क असणाऱ्या गावांची संख्या १ हजार २२५ इतकी आहे. या सर्व गावापर्यंत एसटी पोहोचावी, असे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी दिल्या. बैठकीत त्यांनी दैनंदिन बसफेऱ्या, बसगाड्यांची स्थिती, चालक-वाहक संख्या आदीचा आढावा घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)ंंदोन डेपो व सहा बसस्थानकांंसाठी जागेची आवश्यकताराज्य परिवहन महामंडळाकडे २५० मोठ्या व नऊ मिनी बसेस आहेत. महामंडळाच्या गडचिरोली विभागात सिरोंचा, ब्रह्मपुरी व गडचिरोली हे तीन उपविभाग आहेत. यापैकी गडचिरोली व सिरोंचा येथे डेपो तयार करण्यासाठी महामंडळाला जागेची आवश्यकता आहे. तसेच आलापल्ली, चामोर्शी, आष्टी, एटापल्ली, मुलचेरा व भामरागड या सहा बसस्थानकासाठी महामंडळाला जागा हवी आहे. या सर्व ठिकाणांचा आराखडा तयार करून ज्या ठिकाणी सरकारी जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी जागा देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नायक बैठकीत म्हणाले.