शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: गडचिरोलीत पॉझिटिव्ह आढळलेल्या ठाण्यातील व्यक्तीत कोरोनाचा नवीन स्ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 19:37 IST

New strain of coronavirus found in Gadchiroli : ठाणे येथील ती व्यक्ती २५ दिवसांपूर्वी सरकारी कामानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथे आली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांची अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

 गडचिरोली -  मूळच्या ठाणे शहरातील आणि कार्यालयीन कामानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या एका व्यक्तीत कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्याचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेने दिला. दरम्यान ती व्यक्ती कोरोनाग्रस्त होऊन आता पूर्णपणे बरीही झाली आहे. एवढेच नाही तर त्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आलेले दोन स्थानिक नागरिकही आता पूर्णपणे बरे झाले आहेत. ठाणे येथील ती व्यक्ती २५ दिवसांपूर्वी सरकारी कामानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथे आली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांची अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना गडचिरोलीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या संपर्कातील आलापल्ली येथील दोन व्यक्तीही पॉझिटिव्ह होत्या. ते सर्वजण पूर्ण उपचारानंतर घरीही गेले. (New strain of coronavirus found in Gadchiroli)

दरम्यान आरोग्य विभागाने नेहमीप्रमाणे एकूण पॉझिटिव्ह नमुन्यांपैकी ५ टक्के नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवाल आता आला असून ठाणे येथून आलेल्या त्या व्यक्तीच्या नमुन्यात इंग्लंडमधील कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. आरोग्य विभागाने याला दुजोरा दिला आहे. गडचिरोलीत आढळलेला हा कोरोनाच्या नवीन विषाणूचा पहिलाच रुग्ण होता. गेल्या महिनाभरात गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही हे विशेष. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGadchiroliगडचिरोलीthaneठाणे