कोरोनामुळे दोन वृद्ध नागरिकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 05:00 AM2020-10-28T05:00:00+5:302020-10-28T05:00:28+5:30

काही रूग्णांना कोरोनाची अजिबात लक्षणे नाहीत. तर काहींना अतिशय सौम्य लक्षणे आहेत. अशा रूग्णांना घरीच राहून उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा फक्त शहरी भागातील रूग्णांसाठी असून त्यांच्याकडे स्वतंत्र बेडरूम, शौचालय व बाथरूमची सुविधा उपलब्ध आहे. शहरी भागातील २४१ रूग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. काही रूग्ण घरी उपचार घेत असल्यामुळे कोविड केअर सेंटरवरील ताण कमी होण्यास मदत होत आहे.

Corona kills two elderly citizens | कोरोनामुळे दोन वृद्ध नागरिकांचा मृत्यू

कोरोनामुळे दोन वृद्ध नागरिकांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे८७ बाधितांची भर : मृत्यूदर पोहोचला १ टक्क्यांवर; रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.०४ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनामुळे जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील ७० वर्षीय पुरूष व गडचिरोली तालुक्यातील गोविंदपूर येथील ६० वर्षीय अस्थमा आजाराने ग्रस्त व्यक्तींचा समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या ५ हजार ४२३ झाली आहे. त्यापैकी ५०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ८६६ रूग्ण उपचार घेत आहेत. एकूण मृत्यूंची संख्या ५४ झाली आहे. ८७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर११४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोलीतील शिवाजी नगर येथील २, साईनगर २, एलआयसी चौक जवळ सोनापुर कॉम्पलेक्स ३, बसेरा कॉलनी १, कॅम्प एरिया १, रेव्हेन्यु कॉलनी १, गोकुलनगर १, शिवाजीनगर १, नवेगाव २, आयटीआय चौक २, नवेगाव येथील एसबीआय बँकेच्या मागे, मेडिकल कॉलनी १, रेड्डी गोडाऊन १, गोविंदपूर १, स्नेहानगर १, मुरखडा १, लक्ष्मीनगर १, स्थानिक १, अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १२, नागेपल्ली २,आलापल्ली २, खमनचेरु १, आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ५, वडधा येथील १, भामरागड तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये कुनघाडा १, फुसगुडा १, आष्टी १, घोट ५, ईल्लुर १, एटापल्ली तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ३, कोरची तालुक्यातील बाधितांमध्ये कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये उराडी १, पीडब्ल्यूडी कार्यालय १, गोठणगाव १, स्थानिक १, रामगड १, राणाप्रताप वॉर्ड १, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये सुंदरनगर १, स्थानिक १, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ४, व देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये कोरेगाव येथील ५, भगतसिंग वॉर्ड १, चोप येथील २, सीआरपीएफ जवान १, सावंगी १, दत्ता राईसमिल जवळ कोरेगाव ४, तसेच इतर तालुक्यातील बाधितांमध्ये १ जणांचा समावेश आहे.

२४१ रूग्ण घरीच घेत आहेत उपचार
काही रूग्णांना कोरोनाची अजिबात लक्षणे नाहीत. तर काहींना अतिशय सौम्य लक्षणे आहेत. अशा रूग्णांना घरीच राहून उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा फक्त शहरी भागातील रूग्णांसाठी असून त्यांच्याकडे स्वतंत्र बेडरूम, शौचालय व बाथरूमची सुविधा उपलब्ध आहे. शहरी भागातील २४१ रूग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. काही रूग्ण घरी उपचार घेत असल्यामुळे कोविड केअर सेंटरवरील ताण कमी होण्यास मदत होत आहे. शहरी भागातील बहुतांश रूग्ण या सुविधेचा लाभ घेत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांकडे स्वतंत्र बेडरूम, शौचाललय उपलब्ध राहत नसल्याने त्यांना होम आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करून दिले जात नाही.

Web Title: Corona kills two elderly citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.