शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांचा तहसीलदारांना घेराव

By admin | Updated: September 13, 2014 01:35 IST

मुरूम, विटाच्या परवान्यासाठी तहसील कार्यालयात सादर केलेले अर्ज तत्काळ निकाली काढावे व सुशिक्षित बेरोजगारांच्या ....

देसाईगंज : मुरूम, विटाच्या परवान्यासाठी तहसील कार्यालयात सादर केलेले अर्ज तत्काळ निकाली काढावे व सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम द्यावा या मागण्यांसाठी सुशिक्षित बेरोजगार संघर्ष समितीच्यावतीने देसाईगंजच्या तहसीलदारांना शुक्रवारी घेराव घालण्यात आला. भाकपाचे जिल्हासचिव डॉ. महेश कोपुलवार यांच्या नेतृत्वात देसाईगंज तालुक्यातील शेकडो सुशिक्षीत बेरोजगार संघटित झाले. त्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना घेराव घालण्यात आला. दरम्यान तहसीलदारांना सुशिक्षित बेरोजगार हक्क संघर्ष समितीच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शहरात सध्या बांधकामे वाढली आहेत. यामुळे या बांधकामासाठी साहित्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे विटा, मुरूम साहित्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना परवाने देणे आवश्यक आहेत. मात्र स्थानिक तहसील कार्यालयामार्फत गेल्या काही दिवसांपासून परवाने देणे बंद झाले आहेत. परिणामी शहरातील विटा व मुरूम साहित्याचा पुरवठा करणारे सुशिक्षीत बेरोजगाराच्या हाताला काम नाही. यामुळे नाइलाजाने अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन करावे लागते, असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी ईलीयास खान, बेरोजगार हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष बालूगिरी, किशोर चौधरी, हरिष डांगे, बादलशहा, आशीफ शेख, श्रवण बुल्ले, खालीद कुरेशी, उमेश देवढगले, उल्हास पत्रे, सोनू पठाण, राहूल राऊत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)