शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

पर्लकोटावरील जुन्या पुलाचे बंधाऱ्यात रूपांतर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST

यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पर्लकोटा नदीचे पात्र कोरडे झाल्याने भामरागडवासीयांची चिंता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पर्लकोटा नदीला संजीवनी मिळाली. अचानक पात्रातील पाणी वाढले. नवीन पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रात तयार केलेल्या तात्पुरत्या रस्त्यामुळे नदीतील वाहून जाणारे पाणी थांबून बंधाऱ्यासारखे स्वरूप आले आहे. त्यातूनच अनेकांनी जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करण्याची कल्पना सुचवली आहे.

ठळक मुद्देभामरागडवासीयांकडून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रम राबवण्याची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभामरागड : पर्लकोटा नदीवर नवीन उंच पुलाचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करून वाहून जाणारे पाणी अडविल्यास उन्हाळ्यात भामरागडमधील भूजल पातळी कमी होणार नाही, असे  मत नगरवासीयांकडून व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील भामरागडच्या घनदाट जंगलात दरवर्षी भरपूर पाऊस पडतो; पण अलीकडे झपाट्याने जंगल नष्ट होत आहे. त्यामुळे तापमानात दिवसागणित वाढ होण्यासोबतच भूजल पातळीही खालावत आहे. पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रवती या तीनही नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. मात्र, पावसाळा संपताच कोरड्या पडतात. यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पर्लकोटा नदीचे पात्र कोरडे झाल्याने भामरागडवासीयांची चिंता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पर्लकोटा नदीला संजीवनी मिळाली. अचानक पात्रातील पाणी वाढले. नवीन पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रात तयार केलेल्या तात्पुरत्या रस्त्यामुळे नदीतील वाहून जाणारे पाणी थांबून बंधाऱ्यासारखे स्वरूप आले आहे. त्यातूनच अनेकांनी जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करण्याची कल्पना सुचवली आहे.भूजल पुनर्भरणाची गरज लक्षात घेऊन  ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ ही राज्य सरकारची जुनीच संकल्पना गांभीर्याने राबविणे काळाची गरज झालेली आहे. शेजारील चंद्रपूर जिल्ह्यात जानाळा-पोंबुर्णा मार्गावरील अंधारी नदीवर याच पद्धतीने जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात केले आहे. 

पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडून वाढल्या अपेक्षागेल्या २० वर्षांपासून पर्लकोटा नदीवरील पुलाचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे. हे बांधकाम सुरू झाल्यानंतर वनविभागाच्या आडकाठीने पुन्हा थांबले होते. कंत्राटदारसुद्धा पळ काढण्याच्या तयारी होते; परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी विशेष लक्ष देऊन मंत्रालयात केलेल्या पाठपुराव्याने या कामातील अडथळे दूर होऊन हे काम पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडून भामरागडवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करण्यासाठीही ते सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भामरागडवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

 

टॅग्स :riverनदीWaterपाणी