शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

झाडावरच दाणापाण्याची केली सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:19 IST

उन्हाळ्यात पक्ष्यांना भेडसावणारी चारा व पाण्याची समस्या लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीतर्फे झाडावरच मातीचे पात्र टांगून पक्ष्यांच्या पाणी व चाऱ्याची सोय केली आहे.

ठळक मुद्देपक्ष्यांचा किलबिलाट वाढला : अहेरी-महागाव मार्गावर ५० झाडांना बांधले मातीचे शेकडो पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : उन्हाळ्यात पक्ष्यांना भेडसावणारी चारा व पाण्याची समस्या लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीतर्फे झाडावरच मातीचे पात्र टांगून पक्ष्यांच्या पाणी व चाऱ्याची सोय केली आहे.अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ तलांडे यांच्या नेतृत्वात ही समिती अहेरी जिल्हा निर्मितीसाठी मागील सात वर्षांपासून सातत्याने संघर्ष करीत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यातही ही संस्था पुढाकार घेत असल्याने अहेरी विभागात या समितीची विशेष ओळख आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. जंगल तसेच शेतशिवारातील नदी, नाले, तलाव निर्जल झाले आहेत. उष्णतेचा पारा ४४ अंशापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पाण्याची पूर्वीपेक्षा अधिक गरज असताना जलसाठे आटले आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांना गावाकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय शिल्लक राहला नाही. जंगलात एखादा पाणवटा असल्यास त्या ठिकाणी पशुपक्षी गोळा होत असल्याने शिकारी टपूनच राहतात. अशा परिस्थितीत पक्ष्यांच्या चारा व पाण्याची सोय झाडावरच होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन समितीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ तलांडे यांच्या मार्गदर्शनात अहेरी-महागाव मार्गावरील झाडांवर पाणी व चाºयासाठी पात्र बांधले आहेत.एक किमी अंतरावरील पक्ष्यांसाठी सोयअहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या पुढाकारातून अहेरी-महागाव मार्गावरील जवळपास ५० वृक्षांना मातीचे पात्र बांधण्यात आले आहे. प्रत्येक वृक्षाला जवळपास पाच ते सहा पात्र बांधले आहेत. काही पात्रांमध्ये पाणी तर काही पात्रांमध्ये चारा टाकला जातो. महागाव मार्गावर पहाटेच्या सुमारास फिरायला जाणारे नागरिकही पात्रांमध्ये पाणी व चारा टाकत आहेत. त्यामुळे पक्षी बचाव ही चळवळ निर्माण होण्यास मदत झाली आहे. झाडावरच पाणी व चाºयाची सोय होत असल्याने झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट दिसून येत आहे. अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. इतरही सामाजिक संस्थांनी असे उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.