शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घोेट तालुक्याच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावणार

By admin | Updated: August 27, 2016 01:21 IST

चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून घोट हा नवीन तालुका निर्माण करण्यासाठी येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

आंदोलकांना आमदारांचे आश्वासन : बाजारपेठ, शाळा कडकडीत बंदघोट : चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून घोट हा नवीन तालुका निर्माण करण्यासाठी येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक लावून घोट तालुका निर्माण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना तेथे बोलावून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी घोट येथे उपस्थित जनसमुदायास दिले.घोट तालुक्याची निर्मिती करावी यासाठी शुक्रवारी घोट येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय कडकडीत बंद ठेवण्यात आले. या आंदोलनात व्यापारी, नागरिकही सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व घोट तालुका निर्माण संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के, पं. स. उपसभापती मंदा दुधबावरे, घोटचे सरपंच विनय बारसागडे, उपसरपंच साईनाथ नेवारे, सिमुतलाचे सरपंच सजल बिश्वास, भाडभिडीचे सरपंच एकनाथ भुरसे, पं. स. चे माजी उपसभापती माधव घरामी, उपसरपंच गव्हारे, मक्केपल्लीचे सरपंच डी. डी. कांदो, गिरीश उपाध्ये, विलास गण्यारपवार, बाळाजी येनगंटीवार, डॉ. नंदकिशोर अध्यंकीवार, भारती उपाध्ये, उर्मिला पोगुलवार यांनी केले.यावेळी आंदोलनाला आमदार डॉ. देवराव होळी यांनी भेट देऊन घोट तालुका संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त आंबेडकर चौक व गावातील प्रमुख वॉर्डात ठेवण्यात आला होता. आमदार होळी यांना दिलेल्या निवेदनात घोट तालुक्याची मागणी मागील ३५ वर्षांपासूनची असून अनेकदा शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. नागपूर अधिवेशनात साखळी उपोषण करण्यात आले. घोट परिसरात २१ ग्रामपंचायती असून शासनाची विविध कार्यालये, सहकारी संस्था आहेत. घोट ही मोठी बाजारपेठ असल्याने या गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती. (वार्ताहर)