शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी वाहनचालकांचे उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2017 02:31 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी वाहनचालकांचे प्रलंबित वेतन अदा करण्यात यावे

आरोप : अत्यल्प मानधनावर वाहनचालकांची बोळवण लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी वाहनचालकांचे प्रलंबित वेतन अदा करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी कंत्राटी वाहनचालकांनी सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही जि. प. प्रशासन कंत्राटी वाहनचालकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कंत्राटी वाहनचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जि. प. अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास सेवा देणाऱ्या कंत्राटी वाहनचालकांची केवळ ७ हजार १०० रूपये मानधनावर बोळवण केली जात आहे. वाहनचालकांचे मानधन वाढविण्यासंदर्भात स्थानिक स्तरावरून कुठलीही कार्यवाही अद्याप झाली नाही, असे वाहनचालकांनी म्हटले आहे. त्यामुळे बुधवारपासून वाहनचालकांनी जि. प. समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. १२ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कंत्राटी वाहनचालकाचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे. आरोग्य विभागातील इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी वाहनचालकांच्या वेतनात दरवर्षी वाढ करण्यात यावी, शासकीय सुट्या व्यतीरिक्त वर्षभरात आठ नैमित्तीक रजा तसेच सात वैद्यकीय रजा देण्यात याव्या, वाहनचालकांचा ईपीएफ कपात करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी वाहनचालकांनी उपोषण सुरू केले आहे. रवी शेट्टे, गुरूदास वाढई व विनोद सांगरे हे तीन वाहनचालक उपोषणाला बसले आहेत. पहिल्या दिवशी उपोषण मंडपात उपोषणकर्त्यांसोबत संदीप मुनगंटीवार, रेमाजी शेंडे, सलीम पठाण, गणेश भोयर, मारोती गोरडवार, रवींद्र गुंढरे, गणेश कुबळे, संतोष मासुरकर, वासनिक, जमीर शेख, आरिफ कुरेशी आदी वाहनचालक उपस्थित होते. दोन दिवस उपोषण मंडपाला अनेकांनी भेट दिली.