गणेशनगरातील रस्ता व नालीचे बांधकाम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:42 IST2021-09-15T04:42:12+5:302021-09-15T04:42:12+5:30

येथील बंडू पत्तीवार ते बंडू लिंगे यांच्या घरापर्यंत कच्चा रस्ता आहे. पावसाचे दिवस असल्याने या रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला ...

Construction of roads and drains in Ganeshnagar | गणेशनगरातील रस्ता व नालीचे बांधकाम करा

गणेशनगरातील रस्ता व नालीचे बांधकाम करा

येथील बंडू पत्तीवार ते बंडू लिंगे यांच्या घरापर्यंत कच्चा रस्ता आहे. पावसाचे दिवस असल्याने या रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला पाणी साचून राहते. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना, तसेच पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता व नालीचे बांधकाम करण्यात यावे व याच परिसरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात डुकराचे साम्राज्य वाढत आहे. डुकरांचा वावर राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी देवीदास पालीकोंडावार, संदीप गडे, उंदरू दूधबळे, पीतांबर तलांडे, चरण हजारे, ईश्वर तलांडे व नागरिकांनी केली आहे.

140921\img-20210914-wa0107.jpg

रस्ता व नाली बांधकाम गणेश नगर फोटो

Web Title: Construction of roads and drains in Ganeshnagar