शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१९९९ मध्ये काँग्रेसला हादरा

By admin | Updated: September 21, 2014 23:51 IST

१९९५ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ४० उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रंगत आली होती. त्यानंतर १९९९ मध्ये पार

गडचिरोली : १९९५ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ४० उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रंगत आली होती. त्यानंतर १९९९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रातून २१ उमेदवारांनी आपले भाग्य अजमाविले होते. या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसला जबरदस्त हादरा बसला. आरमोरी शिवसेना, गडचिरोलीत भाजप तर सिरोंचा गोंडवाना गणतंत्र पार्टीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. आरमोरी विधानसभा क्षेत्रात एकूण १ लाख ७३ हजार १०२ मतदारांपैकी १ लाख २९ हजार ६१२ मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत शिवसेनेचे रामकृष्ण हरि मडावी यांनी ३६ हजार ४१० मते प्राप्त करीत विजय मिळविला. काँग्रेसचे आनंदराव गंगाराम गेडाम यांना ३६ हजार ४, अपक्ष नंदू नरोटे यांना १६ हजार ४३९, राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिराम वरखडे यांना १४ हजार २७९ मते प्राप्त झाले. तर बसपाचे श्रीराम मडावी यांना ९९१ मतांवरच समाधान मानावे लागले. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण १ लाख ७७ हजार ५२६ मतदारांपैकी १ लाख २४ हजार ६८० मतदारांनी आपला हक्क बजाविला. यापैकी १ लाख १७ हजार ५५२ मते वैध ठरली. या निवडणुकीत भाजपचे अशोक महादेव नेते यांनी ४७ हजार ३९१ मते प्राप्त करीत विजयी मिळविला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मारोतराव सैनुजी कोवासे यांना ३९ हजार २९३, राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेव दल्लूजी उसेंडी यांना १७ हजार ७८७ मते प्राप्त झाली. सिरोंचा विधानसभा क्षेत्रातील १ लाख ७३ हजार १०० मतदारांपैकी १ लाख २१ हजार १९३ मतदारांनी निवडणुकीत हक्क बजाविला. या निवडणुकीत गणतंत्र पार्टीचे धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांनी २७ हजार ९८२ मते प्राप्त करीत विजयी मिळविला. काँग्रेसच्या सगुणा तलांडी यांना २७ हजार ६०७ तर नाविसचे सत्यवानराव आत्राम यांना २३ हजार ९९१, भाजपचे जोगा मडावी यांना २० हजार ९७९, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मल्लाजी आत्राम यांना १० हजार ७६५ मते मिळाली.