शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
5
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
6
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
7
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
8
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
9
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
10
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
11
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
14
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
15
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
16
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
17
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
18
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
19
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
20
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरीवर काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2015 02:01 IST

शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार व सर्वसामान्यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या वतीने ....

सरकारविरोधी रोष रस्त्यावर : शेतकरी, शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी
गडचिरोली : शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार व सर्वसामान्यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या वतीने गुरूवारी येथील इंदिरा गांधी चौकातून काढण्यात आलेला विशाल मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार युवक सहभागी झाले होते.
ट्रॅक्टर व बैलबंडीवर काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्त्व काँग्रेसचे विधानसभा उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केले. येथील इंदिरा गांधी चौकात काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी व शेतमजूर दुपारी १ वाजता गोळा झाले. त्यानंतर १.१५ वाजता ट्रॅक्टर व बैलबंडीवर निघालेला मोर्चा १.४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचला.
या मोर्चात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश कुमरे, काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख विनोद दत्तात्रय जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, माजी जि.प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर, अ‍ॅड. राम मेश्राम, पं.स. सभापती देवेंद्र भांडेकर, कल्पना वड्डे, शामिना उईके, पं.स. उपसभापती चंदू वडपल्लीवार, रहिम शेख, नंदू वाईलकर, नरेंद्र भरडकर, प्रभाकर वासेकर, समशेर खॉ पठाण, सतिश विधाते, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, युवक काँग्रेसचे गडचिरोली विधानसभा अध्यक्ष अतुल मल्लेलवार, राकेश रत्नावार, वैभव भिवापुरे, नितेश राठोड, राजू गारोदे, देवाजी सोनटक्के, सी. बी. आवळे, सुनिल खोब्रागडे, लता पेदापल्ली, महेंद्र ब्राह्मणवाडे, मनिष डोंगरे, जि.प. सदस्य सुकमा जांगधुर्वे, शांता परसे, नगरसेविका लता मुरकुटे, पुष्पा कुमरे, नंदू कायरकर, शरद मुळे, करूणा गणवीर, शंकरराव सालोटकर, किशोर वनमाळी, विलास ढोरे, राजेश ठाकूर, मेहबूब अली, मुक्तेश्वर गावडे, मनोहर पोरेटी, रवींद्र शहा, जि.प. सदस्य केशरी उसेंडी, बंडू शनिवारे, विनोद खोबे, माजी पं.स. सभापती पी. आर. आकरे, अमिता मडावी आदीसह काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार युवक सहभागी झाले होते.
काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मोर्चाला संबोधित केल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे यांना दिले. आंदोलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (स्थानिक प्रतिनिधी)
या आहेत प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, धानाला प्रती क्विंटल ३ हजार ५००, कापसाला प्रती क्विंटल सात हजार व सोयाबिनला प्रती क्विंटल चार हजार रूपये भाव देण्यात यावा, आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाचे शेतकऱ्याचे थकलेले १२ कोटी २८ लाख रूपयांचे चुकारे तत्काळ द्यावे, दुबार पेरणीसाठी बी -बियाणे व खतांचा मोफत पुरवठा करावा, सुधारित केंद्रीय भूमीअधिग्रहण कायदा रद्द करावा, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, रखडलेल्या सिंचन प्रकल्पाला निधी उपलब्ध करून काम पूर्ण करावे, महिला व बाल रूग्णालय सुरू करावे, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमाकरिता १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, गडचिरोली जिल्हा विकास प्राधिकरणाला मंजुरी देऊन ते कार्यान्वित करावे.