शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीतील कोंडलेल्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST

गेल्या अनेक वर्षांपासून काही भागात अतिक्रमण कायम होते. शहरातील अनेक रस्त्यावर दुकानदार आणि काहींनी फुटपाथवर शेड बांधून अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नगर परिषदेने शहरात मुनादी देऊन सार्वजनिक रस्त्यावर ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांनी ते तत्काळ काढावे, अशी सूचना दिली होती. मात्र व्यावसायिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण काढले नव्हते. 

ठळक मुद्देअतिक्रमण हटविले : दोन दिवसात ४० वर बांधकामांवर चालला जेसीबी

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : स्थानिक नगर परिषदेने सोमवार दि. ५ जुलैपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन शहरातील रस्त्यांवर अनेक व्यावसायिक आणि नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढले. बुधवारी ही मोहीम थंडावली असली तरी दोन दिवसात ४० वर बांधकामे पाडण्यात आली. यामुळे कोंडलेल्या रस्त्यांनी बऱ्यापैकी मोकळा श्वास घेतला. काही दिवसानंतर पुन्हा ही मोहीम राबविली जाणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून काही भागात अतिक्रमण कायम होते. शहरातील अनेक रस्त्यावर दुकानदार आणि काहींनी फुटपाथवर शेड बांधून अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नगर परिषदेने शहरात मुनादी देऊन सार्वजनिक रस्त्यावर ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांनी ते तत्काळ काढावे, अशी सूचना दिली होती. मात्र व्यावसायिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण काढले नव्हते. ही मोहीम मुख्याधिकारी डॉ.माधुरी सलामे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता अविनाश बंडावार, पाणी व स्वच्छता अभियंता नितीन गौरखेडे, कार्यालय अधीक्षक ओसीन मडकाम, कर निरीक्षक बी.आर.पिंपळे, लेखापाल संजय शेळके, लिपीक योगेश दुमाने, गिरीश बांते, राजू कांबळे आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राबविली.

हे मार्ग झाले मोकळे- नगर परिषद प्रशासनाने साेमवारपासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली व सार्वजनिक रस्त्यावर व नालीवर असलेले अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने काढून रस्ते मोकळे केले. पहिल्या दिवशी जुन्या बसस्थानकापासून तर नगर परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील व्यावसायिक व छोट्या दुकानदारांनी लावलेले टिनाचे शेड, झोपड्यांचे अतिक्रमण काढले. - दुसऱ्या दिवशी मंगळवारला इंदिरा गांधी चौकापासून गुजरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या दुकानदारांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. शहरात सर्वाधिक वाहतुकीची कोंडी या रस्त्यावर होत होती.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण