भामरागड संपर्कात, आता आरोग्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:33+5:30

यावर्षीच्या पुराने २०१० च्या महापुरापेक्षाही महाभयंकर स्थिती निर्माण झाल्याचा अनुभव अनेक नागरिक सांगत आहेत. नगरातील मध्य बाजारपेठ, आंबेडकर वार्ड, आयटीआय व शोभानगरमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पहाटेची वेळ असल्याने मध्य बाजारपेठ वगळता गावातील इतर नागरिक गाढ झोपेत होते.

Communication with Bhamragad, now a health challenge | भामरागड संपर्कात, आता आरोग्याचे आव्हान

भामरागड संपर्कात, आता आरोग्याचे आव्हान

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांची भेट : घरे, दुकानांच्या तळमजल्यावर चिखल

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहात असल्याने गेल्या आठवडाभरापासून संपर्काबाहेर असलेल्या आणि गावात पाणी शिरल्याने हाह:कार उडालेल्या भामरागडला मंगळवारी सकाळी दिलासा मिळाला. गावातील पाणी ओसरण्यासोबतच पर्लकोटावरील पुलाने मोकळा श्वास घेतल्याने नागरिकांचा आणि प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. आता गावात स्वच्छता ठेवण्यासोबत शुद्ध पाणी पुरवठा करणे आणि आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेण्याचे आव्हान कायम आहे.
यावर्षीच्या पुराने २०१० च्या महापुरापेक्षाही महाभयंकर स्थिती निर्माण झाल्याचा अनुभव अनेक नागरिक सांगत आहेत. नगरातील मध्य बाजारपेठ, आंबेडकर वार्ड, आयटीआय व शोभानगरमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पहाटेची वेळ असल्याने मध्य बाजारपेठ वगळता गावातील इतर नागरिक गाढ झोपेत होते. अशातच पाणी शिघ्र गतीने वाढत असल्याने घरातील सामान काढण्यासाठीही नागरिकांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांचा जीव वाचला असला तरी मोठे नुकसान झाले आहे. घरातील अन्नधान्य खराब झाले, गाळ व कचºयाची दुर्गंधी येवू नये आणि बीमारी पसरू नये या हेतूने तहसीलदार कैलास अंडील, एसडीपीओ डॉ. कुणाल सोनवने यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिम राबविण्यास सुरूवात झाली.

लोकबिरादरी टीमचे श्रमदान
तब्बल पाच दिवसांनी १० सप्टेंबरला सकाळी ९ वाजता नदीपुलावरील पूर ओसरला. मात्र भामरागडमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरून दुर्गंधी पसरल्याने रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदार अंडील यांनी श्रमदान करून स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन सर्वांना केले. त्याला प्रतिसाद देत हेलकसा येथील लोकबिरादरी टीमने अनिकेत आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राचार्य डॉ.विलास तळवेकर व सचिन मुक्कावार यांच्या नेतृत्वात श्रमदान केले. यात लोकबिरादरीतील कर्मचारी व कार्यकर्ते तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे काही विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी साचलेला गाळ उचलला. चिखलाने घसरण झालेला रस्ता पाण्याने धुवून काढला. बाजारपेठेत साचलेला कचरा उचलला. स्थानिक दुकानदारांना सामान हलविण्यास मदतही केली. या टीममध्ये मुख्याध्यापक शरिफ शेख, अधीक्षक अशोक चापले, क्र ीडा शिक्षक विवेक दुबे, प्रा.गिरीश कुलकर्णी, प्रा.खुशाल पवार, शिक्षक सुरेश गुट्टेवार, तुषार कापगते, जमीर शेख, श्रीराम झोडे, प्रकल्पातील कार्यकर्ते प्रफुल्ल पवार, अशोक गायकवाड, केतन फडणीस, गोपाळ बारदेव, दीपक मेश्राम, गणेश हिवरकर आदींचा सहभाग होता. मुकेश ठेकेदार यांनी स्वत:चे डिजेल इंजिन लावून पाण्याची सोय करून दिली आणि पूर्णवेळ श्रमदानही केले.
 

Web Title: Communication with Bhamragad, now a health challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.