शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत एटापल्ली येथील पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

१० हजार लोकसंख्या असलेल्या एटापल्ली शहराला डुम्मी नाल्यावरून पाणीपुरवठा केला जातो. डुम्मी नाल्यावर विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीचे पाणी गावातील टाकीमध्ये टाकून पाणीपुरवठा केला जातो. दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असतानाच सहा दिवसांपूर्वी अचानक एटापल्लीचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देमोटारमध्ये बिघाड : सणाच्या कालावधीत पाण्यासाठी महिलांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : ऐन दिवाळीच्या कालावधीत एटापल्ली येथील पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. त्यामुळे एटापल्लीवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.१० हजार लोकसंख्या असलेल्या एटापल्ली शहराला डुम्मी नाल्यावरून पाणीपुरवठा केला जातो. डुम्मी नाल्यावर विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीचे पाणी गावातील टाकीमध्ये टाकून पाणीपुरवठा केला जातो. दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असतानाच सहा दिवसांपूर्वी अचानक एटापल्लीचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळ योजना बंद असल्याबाबत नगर पंचायतीचे अभियंता नंदनवार यांना विचारणा केली असता, मोटार नादुरूस्त असल्याने पाणीपुरवठा बंद आहे. दोन दिवसात मोटार सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले.नळांद्वारे पाणीपुरवठा ज्या दिवशी होत नाही, त्या दिवशी महिला हातपंपाचे पाणी भरतात. मात्र एटापल्ली नगर पंचायतीने हातपंप दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले असल्याने अनेक हातपंप बंद आहेत, असा आरोप मनोज वरगंटीवार यांच्यासह नागरिकांकडून होत आहे. आठ वर्षांपूर्वी योजना बांधण्यात आली. त्यानंतर शहराचा विस्तार दरवर्षी होत आहे. नवीन वस्त्या वाढत आहेत. मात्र या नवीन वस्त्यांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आली नाही.एटापल्ली नगर पंचायतीअंतर्गत एटापल्ली टोला, कृष्णार, जीवनगट्टा, मरपल्ली, वासामुंडी या गावांचा समावेश होतो. मात्र या गावांना नळ योजनेची सुविधा उपलब्ध नाही. केवळ एटापल्ली शहरालाच नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. विशेष म्हणजे एटापल्ली येथे ग्रामपंचायत असताना पाणीपुरवठा योजना बांधण्यात आली. नगर पंचायतीची निर्मिती होेऊन आता पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी होत चालला आहे. मात्र या योजनेत कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. डुम्मी नाल्यावरच दोन विहिरी खोदल्या आहेत. मात्र मोटार बसविणे, विद्युत पुरवठा आदी कामे करण्यात आली नाही. ज्या विहिरीतून सध्या पाणीपुरवठा सुरू आहे ती विहीर आकाराने लहान आहे. पाणी पुरत नसल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.बांडे नदी भागवू शकते अनेक गावांची तहानबांडे ही एटापल्ली तालुक्यातील सर्वात मोठी नदी आहे. ही नदी अनेक गावांना वळसा घालून पुढे जाते. विशेष म्हणजे जंगलातून वाहत असल्याने या नदीला बारमाही पाणी राहते. एटापल्लीपासून ही नदी जेमतेम पाच किमी अंतरावर आहे. या नदीवर पाणीपुरवठा योजना तयार केल्यास एटापल्लीसह तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावांची तहान भागू शकते. सर्वांसाठी एक संयुक्त पाणीपुरवठा योजना बांधल्यास ती यशस्वी होऊ शकते.

टॅग्स :water shortageपाणीकपात