गडचिराेली शहरात टोमॅटो पाेहाेचले १०० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 05:00 AM2021-11-19T05:00:00+5:302021-11-19T05:00:34+5:30

गडचिराेली शहरात प्रामुख्याने नागपूर येथून भाजीपाला आणला जाते. नागपुरात तेलंगणा, मध्य प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातून भाजीपाल्याचा पुरवठा हाेते. एक महिन्यापूर्वी मराठवाड्यात पूर आल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा भाजीपाला वाहून गेला. त्यामुळे नागपूर बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. याचा थेट परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. एक महिन्यापूर्वी २० ते ३० रुपये किलाे दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे भाव आता ८० ते १०० रुपये किलाेवर पाेहाेचले आहेत.

In the city of Gadchirali, tomatoes are sold at Rs | गडचिराेली शहरात टोमॅटो पाेहाेचले १०० रुपयांवर

गडचिराेली शहरात टोमॅटो पाेहाेचले १०० रुपयांवर

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क 
गडचिराेली : गडचिराेली बाजारपेठेत टोमॅटोचे भाव १०० रुपये किलाेवर पाेहाेचले आहेत. आजपर्यंत एक किलाे टोमॅटो खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर केवळ पावभर टोमॅटो खरेदी करण्याची वेळ आली आहे. 
गडचिराेली शहरात प्रामुख्याने नागपूर येथून भाजीपाला आणला जाते. नागपुरात तेलंगणा, मध्य प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातून भाजीपाल्याचा पुरवठा हाेते. एक महिन्यापूर्वी मराठवाड्यात पूर आल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा भाजीपाला वाहून गेला. त्यामुळे नागपूर बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. याचा थेट परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. एक महिन्यापूर्वी २० ते ३० रुपये किलाे दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे भाव आता ८० ते १०० रुपये किलाेवर पाेहाेचले आहेत. प्रत्येक भाजीत टोमॅटोचा वापर केला जाते. त्यामुळे टोमॅटोचे भाव वाढल्याबराेबर अनेकांचे बजेट बिघडले आहे.

गडचिराेली शहरातील भाजीपाल्याचे प्रतिकिलाे दर
भाजीपाला    दर
टोमॅटो    १००
पत्ताकाेबी    ४०
फूलकाेबी    ६०
कारले    ६०
वांगी    ४०
कांदे    ५०
सांबार    ८०
आलू    ४०
चवळी शेंगा    ६०

गडचिराेली शहरात प्रामुख्याने नागपूर येथून भाजीपाला आणला जातो. त्यामुळे नागपूरच्या बाजारपेठेतील भाजीपाल्याच्या दरावर गडचिराेली शहरातील भाजीपाल्याचे दर अवंलबून आहेत. मागील तीन दिवसांपासून नागपूर बाजारपेठेतील टोमॅटोची आवक घटली असल्याने भाव वाढले आहेत. तसेच डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे टोमॅटोसह इतर भाजीपाला महाग झाला आहे. 
- जितेंद्र बाळेकरमकर, भाजीपाला व्यापारी

इंधनवाढीचा परिणाम
गडचिराेली शहर व जिल्ह्यात येणारा भाजीपाला शेकडाे किमी अंतरावरून वाहतूक करून आणला जाते. यासाठी माेठ्या प्रमाणात वाहतूक खर्च येताे. मागील काही दिवसांपासून डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे वाहतूक दरातही वाढ झाली आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या भावावर दिसून येत आहे.

जिल्ह्यातील पावसाने केल्या पालेभाज्या नष्ट

गडचिराेली जिल्ह्यात नाेव्हेंबर महिन्यात मेथी, पालक, सांबार, चवळीमाट, मुळा यांची लागवड केली हाेती. मात्र, आठ दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे पालेभाज्यांची राेपे नष्ट झाली आहेत. नाेव्हेंबर महिन्यात मेथी, पालक स्वस्त मिळण्यास सुरुवात हाेते. मात्र, उत्पादन कमी झाल्याने पालेभाज्या अजूनही महागच आहेत. 

 

Web Title: In the city of Gadchirali, tomatoes are sold at Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.