इंधन व गॅस दरवाढीविराेधात केंद्र शासनाचा सायकल रॅलीद्वारे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 05:00 IST2021-07-12T05:00:00+5:302021-07-12T05:00:21+5:30

इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल, डिझेलचे दर शतक पार केले आहेत. याचा परिणाम इतर व्यवसायावर झाला. कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. यातच महागाई वाढली असल्याने सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दळणवळणाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना कमालीचा आर्थिक फटका बसत आहे.

Central government's bicycle rally to protest against fuel and gas price hike | इंधन व गॅस दरवाढीविराेधात केंद्र शासनाचा सायकल रॅलीद्वारे निषेध

इंधन व गॅस दरवाढीविराेधात केंद्र शासनाचा सायकल रॅलीद्वारे निषेध

ठळक मुद्देकाँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर : जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : देशभरात पेट्रोल, डिझेलसह गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. वस्तूंचे दर कमी करण्यात यावेत, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिराेली येथे शनिवारी, १० जुलै राेजी सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.
इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल, डिझेलचे दर शतक पार केले आहेत. याचा परिणाम इतर व्यवसायावर झाला. कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. यातच महागाई वाढली असल्याने सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दळणवळणाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना कमालीचा आर्थिक फटका बसत आहे. या आंदोलनात जिल्हा काेषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, काँग्रेस उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, युवक काॅंग्रेसचे प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, एजाज शेख, महासचिव समशेरखा पठाण, सेवादलाचे तालुकाध्यक्ष सुभाष घाईत, रोजगार स्वयंरोजगार सेलचे अध्यक्ष काशिनाथ भडके, बाळू मडावी, राकेश रत्नावार, मनोहर चलाख, रामदास टिपले, अनिल कोठारे, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, महासचिव घनश्याम वाढई, लहुकुमार रामटेके, शंकर डोंगरे, दिवाकर निसार, ढिवरु मेश्राम, तुळशिराम भोयर, आरिफ कनोजे, मिलिंद बागेसर, बाशिद शेख, जिशान शेख, आशिष वाढई, जय चौधरी, आकाश बोलुवार, आलोक गांगरेड्डीवार, वसंत राऊत, कपिल बारसिंगे, किशोर चापले, निखिल खोब्रागडे, प्रतीक बारसिंगे, मिथुन गेडाम, कल्पक मुपीडवार, बबलू कोतकोंडावार, विक्की निकोसे, स्वप्नील घोसे, सोनू म्हशाखेत्री, रेहान शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारविराेधात घाेषणाबाजी
महागाईचा निषेध म्हणून शनिवारी जिल्हा मुख्यालयातील धानोरा मार्गावरील पेट्रोल पंपापासून ते चंद्रपूर मार्गावरील डाेंगरे पेट्रोलपंपापर्यंत कॉंग्रेस कमिटीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविराेधात घोषणाबाजी केली. 

 

Web Title: Central government's bicycle rally to protest against fuel and gas price hike