जिल्ह्यातील ५६२ काेटींच्या ८ रस्त्यांना केंद्र सरकारची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 05:00 AM2021-04-26T05:00:00+5:302021-04-26T05:00:32+5:30

गडचिराेली- चिमूर लाेकसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या प्रमुख आठ मार्गांच्या रुंदीकरण व दुरुस्तीसाठी केंद्र शासनाच्या रस्ते व परिवहन मंत्रालयाने सुमारे ५६२ काेटी ८४ लाख रुपये मंजूर केले आहेत. यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, अशी माहिती खा. अशाेक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या आठ मार्गांमध्ये रेपनपल्ली-सिराेंचा या ५९ किमीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यासाठी २८२ काेटी रूपये मंजूर केले आहेत.

Central Government approves 8 roads of 562 lanes in the district | जिल्ह्यातील ५६२ काेटींच्या ८ रस्त्यांना केंद्र सरकारची मंजुरी

जिल्ह्यातील ५६२ काेटींच्या ८ रस्त्यांना केंद्र सरकारची मंजुरी

Next
ठळक मुद्देखासदारांची माहिती : केंद्रीय रस्ते परिवहन विभागाचा निधी

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गडचिराेली- चिमूर लाेकसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या प्रमुख आठ मार्गांच्या रुंदीकरण व दुरुस्तीसाठी केंद्र शासनाच्या रस्ते व परिवहन मंत्रालयाने सुमारे ५६२ काेटी ८४ लाख रुपये मंजूर केले आहेत. यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, अशी माहिती खा. अशाेक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 
या आठ मार्गांमध्ये रेपनपल्ली-सिराेंचा या ५९ किमीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यासाठी २८२ काेटी रूपये मंजूर केले आहेत. तसेच चिचगड ते काेरची या दरम्यानच्या २२ कि.मी. मार्गासाठी १२ काेटी ७८ लाख, काेरची-कुरखेडा-ब्रम्हपुरी दरम्यानच्या पाच कि.मी. मार्गाच्या मजबुतीकरणासाठी १९.१३ काेटी, मानपूर छत्तीसगड बाॅर्डर ते धानाेरादरम्यानच्या ८ किमी मार्गासाठी ६.९६ काेटी, चाैडमपल्ली ते गुड्डीगुडम या  २४ किमीसाठी ८३.७३ काेटी, गुड्डीगुडम ते गाेविंदपूर या २४ किमीसाठी ८१.२१ काेटी, धानाेरा तालुक्यातील छत्तीसगड बाॅर्डर ते गडचिराेली दरम्यानच्या १२ किमी मार्गासाठी ३४.०३ काेटी, आलापल्ली-भामरागड-लाहेरी-बिनागुडा मार्गादरम्यानच्या आठ किमी मार्गासाठी ४३ काेटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती खा. अशाेक नेते यांनी दिली.  पत्रकार परिषदेला नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमाेद पिपरे, सुधाकर येनगंधलवार, संजय बारापात्रे, डाॅ. भारत खटी, प्रणय खुणे उपस्थित हाेते. या कामांना लवरकच सुरूवात हाेईल, असा विश्वास खासदार अशाेक नेते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केला.

प्रत्येकाने लस घ्यावी
काेराेना प्रतिबंधात्मक लस अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी. केंद्र शासनाने काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजना करण्याची जबाबदारी राज्य शासनावर साेपविली आहे. मात्र राज्य शासनाने याेग्य त्या उपाययाेजना वेळीच न केल्याने राज्यात व जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. काही विराेधक काेराेना प्रतिबंधात्मक लसबाबत अपप्रचार करीत आहेत. मात्र त्याला बळी न पडता प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी, असे आवाहन खा. अशाेक नेते यांनी केले.

 

Web Title: Central Government approves 8 roads of 562 lanes in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.