बाबर यांच्या जन्मदिनी लाेकसाहित्य दिन साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:30+5:302021-01-08T05:58:30+5:30

भामरागड : लाेकसाहित्य लाेकगीत व लाेककलेच्या अभ्यासिका डाॅ. सराेजिनी बाबर यांचा जानेवारी महिन्यात येणारा जन्मदिन लाेकसाहित्य दिन म्हणून शासनाने ...

Celebrate Babur's birthday Laksahitya Day | बाबर यांच्या जन्मदिनी लाेकसाहित्य दिन साजरा करा

बाबर यांच्या जन्मदिनी लाेकसाहित्य दिन साजरा करा

भामरागड : लाेकसाहित्य लाेकगीत व लाेककलेच्या अभ्यासिका डाॅ. सराेजिनी बाबर यांचा जानेवारी महिन्यात येणारा जन्मदिन लाेकसाहित्य दिन म्हणून शासनाने जाहीर करावा, अशी मागणी जगद्गुरू तुकाेबाराय साहित्य परिषद गडचिराेलीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत भामरागडचे तहसीलदार अनमाेल कांबळे यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे आहे. निवेदन देताना साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डाॅ. संताेष डाखरे, डाॅ. कैलास निखारे, डाॅ. दादाजी कुसराम, डाॅ. सुरेश डाेहणे, डाॅ. प्रमाेद घाेनमाेडे, प्रा. चिनन्ना चालुरकर, शैलेश गावडे, बंडू बाेंडे आदी उपस्थित हाेते. डाॅ. सराेजिनी बाबर यांनी आमदार, खासदार म्हणून कार्य करीत असताना विविध विषयांवर ३५८ ग्रंथांची निर्मिती केली, असे निवेदनात म्हटले आहे. डाॅ. बाबर यांना शासनाने जीवनगाैरव पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी केली आहे.

Web Title: Celebrate Babur's birthday Laksahitya Day