शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोट क्षेत्र विकसित होणार

By admin | Updated: May 13, 2014 23:36 IST

ग्रामीण पायाभूत विकास निधी नाबार्ड सहाय्यातून मेघा पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत राज्यासह जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रांना सुधारित मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.

गडचिरोली : ग्रामीण पायाभूत विकास निधी नाबार्ड सहाय्यातून मेघा पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत राज्यासह जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रांना सुधारित मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली व भामरागड या दुर्गम तालुक्याची निवड करण्यात आली आहे.

या संदर्भात राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाने १२ मे २0१४ रोजी नवा शासन निर्णय काढून नाबार्ड अर्थसहाय्यातून मेघा पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत पाणलोट क्षेत्र विकसीत करण्याचे ठरविण्यात आले आहे.

यानुसार एटापल्ली तालुक्यातील ७८४0.0३ व भामरागड तालुक्यातील २0९३.९0 पाणलोट क्षेत्र विकसीत करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण पायाभूत विकास निधीतून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाकडे सदर क्षेत्र वर्ग करण्यात येणार आहे. भुजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा आणि एमआरएसएसी यांनी घोषीत केलेल्या राज्यातील १ हजार ५0५ पाणलोटांपैकी गरजेनुसार प्रत्येक जिल्ह्यातून चार असे एकूण १३२ मेघा पाणलोट आरआयडीएफ अंतर्गत नाबार्डमार्फत उपलब्ध होणार्‍या निधीतून विकसीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान केंद्र शासनाच्यावतीने सन २00९-१0 पासून एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रम राज्यासाठी मंजूर करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत पाच बॅचमध्ये आतापर्यंत ५७३६.९७ किंमतीचे एकूण १ हजार ४९ प्रकल्प करण्यात आले असून यांतर्गत ४५.२१ लक्ष हेक्टर क्षेत्र विकसीत होणार आहे. नाबार्डची मान्यता मिळालेल्या प्रकल्पातून अहवाल शासनाकडे प्रशासनाला पाठवायचे आहे. पाणलोटातून दोन तालुक्याला न्याय मिळणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)