काेराेना आटाेक्यात; मात्र अद्याप मुक्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:52+5:302021-01-16T04:40:52+5:30

ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टाेबर या तीन महिन्यांमध्ये काेराेनाच्या क्रियाशील रुग्णांची संख्या ९०० वर पाेहाेचली हाेती. रुग्णांची संख्या एक ...

In Carina Atacia; But there is no liberation yet | काेराेना आटाेक्यात; मात्र अद्याप मुक्ती नाही

काेराेना आटाेक्यात; मात्र अद्याप मुक्ती नाही

ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टाेबर या तीन महिन्यांमध्ये काेराेनाच्या क्रियाशील रुग्णांची संख्या ९०० वर पाेहाेचली हाेती. रुग्णांची संख्या एक हजारचा आकडा पार करेल, अशी शक्यता वर्तविली जात हाेती. मात्र, एक हजारला स्पर्श करण्याआधीच कोरोनाला उतरती कळा लागली. नाेव्हेंबरपासून रुग्णांची संख्या कमी हाेण्यास सुरुवात झाली. आता केवळ १३० रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी धानाेरा तालुका वगळता प्रत्येक तालुक्यात काेराेनाचे क्रियाशील रुग्ण आहेत. तसेच भामरागड व मुलचेरा तालुका वगळता प्रत्येक तालुक्यातील रुग्णाचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे.

बाॅक्स...

लस पाेहाेचली तरी सतर्कता आवश्यक

पहिल्या टप्प्यात काेराेना लसीचे १२ हजार डाेस गडचिराेली जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. हे संपूर्ण डाेस आराेग्य कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहेत. आतापर्यंतचे एकूण ९ हजार ९६६ काेराेना रुग्ण आहेत. प्रत्येकाला दाेन डाेस याप्रमाणे सहा हजार कर्मचाऱ्यांनाच लस मिळणार आहे. उर्वरित चार हजार ९६६ कर्मचाऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. सामान्य नागरिकांना लस देण्याबाबत अजूनपर्यंत हालचाली सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांना लसीसाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे.

तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्ण

तालुका ॲक्टिव्ह रुग्ण

अहेरी १४

आरमाेरी ११

भामरागड ०१

चामाेर्शी ११

धानाेरा ००

एटापल्ली ०४

गडचिराेली २९

कुरखेडा ०७

काेरची २४

मुलचेरा ०६

सिराेंचा ०९

देसाईगंज १२

एकूण १३०

बाॅक्स.....

काेराेनाग्राफी

ॲक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण १.४०

मृत्यू दर १.४३

बाधित गावांचे प्रमाण १९.४३

हाेम आयसाेलेशनचे प्रमाण १९.२३

रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९७.४३

बाॅक्स....

मृत्यू १०५

बरे झालेले रुग्ण ९०१८

उपचार घेणारे रुग्ण १३०

Web Title: In Carina Atacia; But there is no liberation yet