दीड महिन्यापासून महागाव मार्गावरील बसफेरी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST2021-02-05T08:53:17+5:302021-02-05T08:53:17+5:30

अनेक नागरिक सकाळी तालुका मुख्यालयात येऊन विविध कामे करून त्याच बसफेरीने पुन्हा गावाकडे सायंकाळी परतत हाेते. परंतु अचानक ही ...

Bus service on Mahagaon route closed for a month and a half | दीड महिन्यापासून महागाव मार्गावरील बसफेरी बंद

दीड महिन्यापासून महागाव मार्गावरील बसफेरी बंद

अनेक नागरिक सकाळी तालुका मुख्यालयात येऊन विविध कामे करून त्याच बसफेरीने पुन्हा गावाकडे सायंकाळी परतत हाेते. परंतु अचानक ही बसफेरी बंद केल्याने नागरिकांची अडचण हाेत आहे. महागाव परिसरात ८ ते १० गावे आहेत. या गावातील नागरिक महागाव येथूनच बाहेरगावी जातात. त्यामुळे महागाव येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी दिसून येते. सध्या बसअभावी कार्यालयीन कामांसाठी ये-जा करणे नागरिकांना कठीण झाले आहे. खासगी व अन्य प्रवासी वाहनांनी लाेेकांना प्रवास करावा लागत आहे. महागाव मार्गाने प्रवास करण्याकरिता एकही बसफेरी सध्या उपलब्ध नाही. नागरिकांना त्रासापासून मुक्त करण्यासाठी चंद्रपूर तसेच अन्य ठिकाणी जाण्यासाठी महागाव मार्गे बसफेरी सुरू करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

बाेरीत जाऊन करावा लागताे पुढचा प्रवास

महागाव मार्गावरील बसफेरी अचानक बंद केल्याने दिवसभर काेणतेच साधन या मार्गावर उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसाेय हाेत आहे. जिल्हा मुख्यालयात अथवा चंद्रपूरला जाण्यासाठी परिसरातील बाेरी येथे खासगी वाहनाने जावे लागते. त्यानंतरच पुढचा प्रवास नागरिकांना करावा लागताे. प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने सध्या महागाव परिसरातील नागरिकांचे हाल हाेत आहेत.

Web Title: Bus service on Mahagaon route closed for a month and a half