शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सराफा व्यापार बंद; तीन कोटींची उलाढाल थांबली

By admin | Updated: March 3, 2016 01:26 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लागू करण्याचे जाहीर केला आहे.

तीन दिवस राहणार दुकाने बंद : सोने-चांदी व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लावल्याचा निषेध गडचिरोली/आरमोरी : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लागू करण्याचे जाहीर केला आहे. या निर्णयाच्या विरोधात सराफा व्यावसायिकांनी तीन दिवसांचा देशव्यापी बंद पुकारला असून, गडचिरोली जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले आहेत. आरमोरीसह जिल्ह्यातील सराफा व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवल्याने तीन कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या व्यवसायावर ए्र टक्का अबकारी कर (एक्साईज ड््युटी) लागू करण्याची घोषणा केली. यामुळे देशभरातील सराफा व्यावसायिकांमध्ये असंतोष पसरला असून, सरकारच्या या निर्णयामुळे सराफा व्यावसायिकांच्या व्यवसायावर विपरित परिणाम होईल. शिवाय अबकारी विभागाचे अधिकारी त्रास देणे सुरु करतील. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचा आम्ही विरोध करीत असल्याचे गडचिरोली सराफा असोसिएशनचे मार्गदर्शक सुधाकर यनगंधलवार यांनी सांगितले. तीन दिवस दुकाने बंद राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गडचिरोली शहरात सोने-चांदीचा व्यवसाय करणारी ३० दुकाने असून, दररोज ३० लाखांची उलाढाल होते. गडचिरोलीसह आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, कुरखेडा, अहेरी या मोठ्या तालुक्यांमध्येही सोने-चांदीचा व्यवसाय तेजीत चालतो. संपूर्ण जिल्हयाचा विचार केल्यास जिल्हाभरात दररोज सुमारे १ कोटींची उलाढाल होते. त्यामुळे तीन दिवसांत ३ कोटींची उलाढाल ठप्प पडणार आहे. आरमोरी येथे या बंद आंदोलनात सराफा असोसिएशनचे अध्यक्ष विजय खरवडे, उपाध्यक्ष दीपक बेहरे, सचिव विनोद बेहरे, पंकज खरवडे, अक्षय बेहरे, अविनाश डुबरे, राजीव बेहरे, सुरेंद्र बेहरे, सैफूभाई जीवानी, अभिजीत बेहरे, राकेश बेहरे आदी सहभागी झाले होते.