खडकी फाट्यावर प्रवासी निवारा बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:39 IST2021-03-09T04:39:10+5:302021-03-09T04:39:10+5:30

मानापूर/देलनवाडी : कुलकुली-अंगारा मार्गावरील खडकी (सिंगराई) फाट्यावर प्रवासी निवारा बांधावा, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. खडकी हे ११०० ...

Build a passenger shelter on a rocky outcrop | खडकी फाट्यावर प्रवासी निवारा बांधा

खडकी फाट्यावर प्रवासी निवारा बांधा

मानापूर/देलनवाडी : कुलकुली-अंगारा मार्गावरील खडकी (सिंगराई) फाट्यावर प्रवासी निवारा बांधावा, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. खडकी हे ११०० लोकसंख्येचे गाव असून या फाट्यापासून एक किमी अंतरावर मालेवाडा ते आरमोरी व गडचिरोली-अंगारा मार्गे प्रवासी वाहने याच मार्गाने आवागमन करीत असतात. येथे प्रवासी निवारा नसल्याने नागरिकांना झाडाझुडूपांचा आधार घ्यावा लागतो. ऊन, वाऱ्यापासून संरक्षणासाठी येथे प्रवासी निवारा बांधावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे; मात्र याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.

राज्य परिवहन महामंडळ तसेच शासनाच्या वतीने बांधण्यात आलेल्या अनेक मार्गावरील प्रवासी निवाऱ्याची देखभाल व दुरुस्तीकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. परिणामी प्रवाशांना पानटपरी व दुकानाच्या शेडचा आधार घ्यावा लागताे.

Web Title: Build a passenger shelter on a rocky outcrop