मुनघाटे महाविद्यालयात ३० विद्यार्थ्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST2021-01-13T05:36:18+5:302021-01-13T05:36:18+5:30

कुरखेडा : दंडकारण्य शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. गाे.ना. मुनघाटे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरखेडा येथील गाेविंदराव मुनघाटे महाविद्यालयात रक्तदान शिबिर ...

Blood donation of 30 students in Munghate College | मुनघाटे महाविद्यालयात ३० विद्यार्थ्यांचे रक्तदान

मुनघाटे महाविद्यालयात ३० विद्यार्थ्यांचे रक्तदान

कुरखेडा : दंडकारण्य शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. गाे.ना. मुनघाटे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरखेडा येथील गाेविंदराव मुनघाटे महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३० विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डाॅ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी रक्तगट तपासणीही करण्यात आली. या शिबिरात प्रा. डाॅ. संजय महाजन, डाॅ. गुणवंत वडपल्लीवार, मंगेश मुनघाटे, राकेश भांडारकर, दीपक तुपटे, लिकेश्वर बावणे, राहुल बुद्धे, लाेकेश हलामी, भूषण सहारे, दिनेश चाैरे, राजेंद्र लाेथे, निकेश बावणे, मुकुल वघारे, प्रीतम दुधकुंवर, नरेश मडावी, सकेलेन पठाण, स्वप्निल टेकाम, पवन मुंगमाेडे, विशाल जुमनाके, लाएबा कादरी, मयूर डाेंबळे, नरेश मडावी, केतन कुमरे, साैरभ काेडापे, नवनाथ मेश्राम, भूषण बुद्धे, चंद्रदीपक बन्साेड आदी ३० विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रमाेद देशमुख, नरेश कंदीकुरवार, डाॅ. बाेरकर, डाॅ. मानकर, गाैरी साळवे, धीरज चांदेकर, टिकेश्वरी करमकार, उपप्राचार्य खाेपे, जिल्हा रासेयाे समन्वयक डाॅ. नरेंद्र आरेकर, विभागीय समन्वयक डाॅ. संजय महाजन, प्रा. डाॅ. रवींद्र विखार, प्रा. डाॅ. संदीप निवडंगे, प्रा. डाॅ. विवेक मुरकुटे, प्रा. डाॅ. अनिल भाेयर यांनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation of 30 students in Munghate College