शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अपघात ही देशासमोरील मोठी समस्या

By admin | Updated: January 12, 2016 01:24 IST

वाढती वाहनांची संख्या व वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे केले जाणारे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

महेश आव्हाड यांचे प्रतिपादन : रस्ता सुरक्षा अभियानाचा गडचिरोलीत शुभारंभगडचिरोली : वाढती वाहनांची संख्या व वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे केले जाणारे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातानंतर संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळते. हे संकट टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, अपघातामुळे दर दिवशी ३७० नागरिक मरण पावतात. २०१३ मध्ये देशभरातील अपघातांमध्ये १ लाख ३७ हजार नागरिक मृत्युमुखी पडले. युद्ध, आतंकवादी हल्ले यांच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने नागरिक अपघातामध्ये मृत्यू पावले आहेत. त्यामुळे अपघात ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या बनली आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले.जिल्हा सुरक्षा समिती, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय गडचिरोली व शहर वाहतूक पोलीस शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक इंदिरा गांधी चौकातील सभागृहात रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, प्राचार्य संजय भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे यांनी बहुतांश अपघात निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहन चालविताना प्रत्येक चालकाने वाहतूक नियमांचे पालन केलेच पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविकादरम्यान सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी फासे यांनी दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात १० ते १२ हजार वाहनांची भर पडत आहे. प्रत्येक १० व्यक्तीमागे एक वाहन आहे. वाहनांची संख्या वाढत चालल्याने देशात प्रत्येक मिनिटाला एक अपघात घडतो. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वत:चे कर्तव्य मानून वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका व वाहतूक नियमांविषयी असलेल्या पत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन निरीक्षक नीलेश बन्सोड यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रशांत इंगवले, नितीन सूर्यवंशी, हर्षल बदन, मेश्राम, नीलेश उराडे, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक अमृता राजपूत यांच्यासह वाहतूक पोलीसांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)