शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडात गंमत जत्रेला प्रारंभ

By admin | Updated: December 25, 2016 01:46 IST

ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर उपाख्य बाबा आमटे यांनी १९७३ मध्ये लोक बिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. २३ डिसेंबर १९७३ ला

चार दिवस कार्यक्रमांची मांदियाळी : प्रकाश व मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते थाटात शुभारंभ भामरागड : ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर उपाख्य बाबा आमटे यांनी १९७३ मध्ये लोक बिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. २३ डिसेंबर १९७३ ला या प्रकल्पाची स्थापना झाली. या प्रकल्पाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत हेमलकसा स्थित लोकबिरादरी प्रकल्पात गंमत जत्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात लोकबिरादरी प्रकल्पाच्या आश्रमशाळेचे विद्यार्थी सहभागी झाले आहे. २३ डिसेंबर हा लोकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापन दिन आहे. २४ डिसेंबर हा डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर २५ डिसेंबर डॉ. मंदाकिनी आमटे यांचा जन्मदिवस आहे. २६ डिसेंबर हा डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्मदिवस व बाबा आमटे यांची जयंती आहे, असा दुर्धर योगायोग साधून लोकबिरादरी प्रकल्पात चार दिवस विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ डिसेंबर रोजी शुक्रवारी लोकबिरादरीला ४३ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सर्व प्रथम स्व. बाबा आमटे व स्व. साधना आमटे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शैक्षणिक गंमत जत्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक गोपाळ फडणीस, भामरागडचे नगराध्यक्ष राजू वड्डे, शेतकरी सिताराम मडावी, डॉ. भारती बोगामी, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी वर्धापन दिनाचे औचित्य साधून लोकबिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या शैक्षणिक गंमत जत्रा या उपक्रमांतर्गत सन २०१६ मधील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध घटनांच्या प्रकल्पांची मान्यवरांनी पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सदर उपक्रम दोन दिवस सुरू राहणार आहे. लोक बिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम दोन दिवस चालणार आहे. चार दिवशीय विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी समिक्षा आमटे यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. विलास तळवेकर, मुख्याध्यापक शरीफ शेख यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी सहकार्य करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)