शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विद्यापीठात घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:54 IST

गडचिराेली : स्थानिक गाेंडवाना विद्यापीठाने सीजीएस अभ्यासक्रमाद्वारे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, चालू वर्षातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन लिंक ...

गडचिराेली : स्थानिक गाेंडवाना विद्यापीठाने सीजीएस अभ्यासक्रमाद्वारे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, चालू वर्षातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन लिंक सुरू करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने १ फेब्रुवारी राेजी विद्यापीठ परिसरात घंटानाद आंदाेलन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी राविकाँचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे आंदाेलन केले. याप्रसंगी राविकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, तालुकाध्यक्ष गिरीश काेरामी, माही ढाली, अक्षय मडावी, मयूरी साखरे, जयमाला दुर्वे, धनश्री वानखेडे, रवी रामटेक, आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित हाेते. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे व प्रभारी कुलसचिव डाॅ. अनिल चिताडे यांच्यासाेबत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, काेराेना संसर्गामुळे विद्यापीठांतर्गत विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देता आली नाही. तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन परीक्षेचे फार्म सादर करून नाेंदणी करता आली नाही. ज्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाेंदणी झाली अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या ढिसाळ नियाेजनामुळे ऑनलाईन प्रश्नपत्रिका उपलब्ध हाेऊ शकली नाही. नेटवर्कच्या तांत्रिक अडचणीमुळे काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देणे शक्य झाले नाही. त्यामुळे विद्यापीठातील ७०० ते ८०० विद्यार्थ्यांना पुन्हा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षापासून प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने सीजीएस या जुन्या अभ्यासक्रमाद्वारेच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने देण्याची संधी द्यावी, असे म्हटले आहे.