शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वैरागडचा पशुवैद्यकीय दवाखाना परिचराच्या भरवशावर

By admin | Updated: October 25, 2014 22:39 IST

शेतकरी व पशुपालकांच्या आजारी जनावरांवर वेळीच औषधोपचार व्हावा, याकरिता शासनाने गडचिरोली जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती केली आहे. मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी

वैरागड : शेतकरी व पशुपालकांच्या आजारी जनावरांवर वेळीच औषधोपचार व्हावा, याकरिता शासनाने गडचिरोली जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती केली आहे. मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी जिल्ह्यातील अनेक पशुवैद्यकीय दवाखाने सध्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर आहे. वैरागड येथील पशुवैद्यकीय दवाखाना पशुधन विकास अधिकाऱ्यांअभावी परिचराच्या भरवशावर असल्याचे वास्तव उजेडात आले आहे. वैरागड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कार्यरत पशुधन विकास अधिकारी डॉ. गणवीर यांचे अपघाती निधन झाले. या घटनेला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र तेव्हापासून या पशुवैद्यकीय दवाखान्याला पशुधन विकास अधिकारी मिळाले नाही. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत याबाबीचा पाठपुरावा करून शासनस्तरावर वैरागडच्या दवाखान्यात नव्या पशुधन विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. वैरागड हे आरमोरी तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे गाव आहे. वैरागड हे परिसरातील १० ते १५ गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. प्रशासनाने वैरागड येथे श्रेणी १ च्या पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती केली आहे. या दवाखान्याच्या हद्दीत मेंढा, वडेगाव, मोहझरी, सुकाम, मेंढेबोडी, पाठणवाडा, करपडा व लोहारा आदी गावे येतात. १५ गावांच्या पशुवैद्यकीय सेवेचा भार असलेल्या या दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी नसल्याने या परिसरातील पशुपालकांना आजारी जनावरांवर औषधोपचार करणे जिकरीचे झाले आहे. पशुधन विकास अधिकाऱ्याअभावी गंभीर आजारी जनावरे अनेकदा दगावली आहेत. वैरागड परिसरात पशुपालकांची संख्या मोठी आहे. जनावरांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने या दवाखान्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी वैरागड परिसरातील पशुपालकांनी केली आहे. (वार्ताहर)