सायबर क्राईमबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST2021-01-13T05:35:05+5:302021-01-13T05:35:05+5:30

आष्टी : येथील श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्यावतीने ‘सायबर क्राईम’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात ...

Awareness among students about cyber crime | सायबर क्राईमबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती

सायबर क्राईमबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती

आष्टी : येथील श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्यावतीने ‘सायबर क्राईम’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ. पंकज चव्हाण हाेते. प्रमुख अतिथी म्हणून पीएसआय नीलेश ठाकरे, नीता कांबळे, मार्गदर्शक म्हणून किरण राेहणकर उपस्थित हाेते. साेशल मीडियाच्या माध्यमातून हॅकर्स जाळे टाकून फसवितात. त्यामुळे काेणत्याही संदेशाला बळी न पडता वैयक्तिक माहिती देऊ नये, असे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डाॅ. रमेश साेनटक्के यांनी केले. यशस्वितेसाठी डाॅ. गाेपालसिंह ताेमर, प्रा. सुबाेध साखरे, डाॅ. प्रदीपक कश्यप, डाॅ. पी.के. सिंह, डाॅ. अपर्णा मारगाेनवार, डाॅ.एम.पी. सिंग, डाॅ. दीपक नागापुरे, डाॅ. प्रकाश राठाेड, प्रा. महेश सिल्लमवार, अरविंद थुटे, संदीप मानापुरे, रवींद्र झाडे, रमेश वागदरकर, देवीदास किवे यांनी सहकार्य केले.

Web Title: Awareness among students about cyber crime