शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीत रूजू करण्यास टाळाटाळ

By admin | Updated: March 4, 2017 01:19 IST

वनरक्षक भरतीत निवड होऊनही वन विभाग रूजू करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवड

आत्मदहनाचा इशारा : मागील तीन वर्षांपासून वन विभागाकडून दिरंगाई गडचिरोली : वनरक्षक भरतीत निवड होऊनही वन विभाग रूजू करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. वन विभागाने नोकरीत रूजू करून घ्यावे, अन्यथा वन विभागाच्या कार्यालय परिसरात आत्मदहन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवड झालेल्या युवकांनी केली आहे. देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील विशाल शंकर दडमल हा २०१४-१५ च्या भरतीत पात्र ठरला. कुरखेडा तालुक्यातील उराडी येथील प्रकाश जनार्धन गरमळे हा २०१५-१६ च्या भरतीत पात्र ठरला. तर कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी येथील बबलू विजय वाघाडे व देविका अशोक गजबे हे डिसेंबर २०१६ मध्ये घेतलेल्या वनरक्षक पदाच्या भरतीत पात्र ठरले. शासनाच्या १२ डिसेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार ज्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. अशा उमेदवाराला नियुक्ती दिली जाते. त्यानंतर तीन महिन्याने सदर उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केल्याची पोचपावती द्यावी लागते. या नियमानुसारच महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गडचिरोली जिल्ह्यात पोलीस विभाग, जिल्हा परिषद व इतर विभागाच्या मार्फतीने नोकरीसाठी नियुक्ती दिली जात आहे. मात्र या चार युवकांना वन विभाग नियुक्ती देण्यास टाळाटाळ करीत आहे. तीन वर्षापासून निवड होऊनही नियुक्ती न मिळाल्याने युवक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नियुक्ती देण्याबाबत अनेकवेळा मुख्य वनसंरक्षकांना निवेदन देण्यात आले. मात्र नियुक्ती देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे सदर युवक मानसिकदृष्ट्या खचले आहेत. त्यामुळे त्यांना वन विभागाने नियुक्ती द्यावी किंवा त्यांना आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आदिवासी माना विद्यार्थी युवा संघटनेचे प्रा. राजू केदार यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला अन्यायग्रस्त युवकही उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)