पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST2021-01-13T05:34:43+5:302021-01-13T05:34:43+5:30

देसाईगंज : ‘समान काम, समान वेतन’ या न्यायाला अनुसरून सर्वच गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांना पदवी प्राप्त हाेताच समान ...

Apply salary range to graduate teachers | पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करा

पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करा

देसाईगंज : ‘समान काम, समान वेतन’ या न्यायाला अनुसरून सर्वच गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांना पदवी प्राप्त हाेताच समान वेतन श्रेणी लागू करून अन्याय दूर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षकांनी केली आहे. यासंदर्भात देसाईगंज येथील विश्रामगृहात आ. कृष्णा गजबे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना समितीचे पदाधिकारी याेगेश ढाेरे, संताेष टेंभुर्णे, मधुकर मिसार, मनीषा नराेटी व शिक्षक उपस्थित हाेते. निवेदनात म्हटले आहे की, शासन परिपत्रकातील अटीनुसार १/३ शिक्षकांनाच वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे. मात्र यामध्ये कित्येक सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होत आहे. कारण पूर्वी सेवेत असताना बीएस्सी पदवी शासन निर्णयान्वये घेता येत नसल्याने सदर शिक्षक कला, वाणिज्य विषयात पदवीधर झालेले आहेत व आजतागायत ९० टक्के विषय शिक्षक बीएस्सी पदवी धारण केलेली आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी भाषेच्या पदवीधर शिक्षकांप्रमाणे गणित, विज्ञान विषय शिक्षक अधिक मेहनत घेत आहेत. यामध्ये इतर पदवीधर शिक्षकांप्रमाणे समान काम करीत आहेत. परंतु शासन निर्णयातील वेतन श्रेणीकरिता १/३ च्या अटीने समान वेतन नसल्याने शिक्षक नाउमेद होत आहेत. कित्येक गणित, विज्ञान विषय शिक्षक वेतन श्रेणीविनाच निवृत्त होणार आहेत.

Web Title: Apply salary range to graduate teachers