गडचिराेली : ओबीसी समन्वय समितीच्यावतीने २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चाचे आयाेजन करण्यात आले आहे. या माेर्चात विद्यार्थीसुद्धा सहभागी हाेणार आहे. त्यामुळे २२ तारखेला शाळा बंद ठेवण्यात याव्या, असे आवाहन ओबीसी समाज समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे. माेर्चाला जिल्हाभरातून हजाराे नागरिक गडचिराेली येथे येणार आहेत. त्यामुळे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वाहतुकीची काेंडी हाेण्याची शक्यता आहे. वाहतूक काेंडीत विद्यार्थी सापडल्यास त्यांना नाहक त्रास सहन करावा लागेल तसेच सायंकाळच्या वेळी माेर्चकरी गावाकडे जातील. त्यावेळी विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळणार नाही. या सर्व अडचणी लक्षात घेऊन २२ तारखेला गडचिराेलीसह जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवाव्यात, असे आवाहन ओबीसी समाज समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
२२ तारखेला शाळा बंद ठेवण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:26 IST
गडचिराेली : ओबीसी समन्वय समितीच्यावतीने २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चाचे आयाेजन करण्यात आले आहे. या माेर्चात विद्यार्थीसुद्धा सहभागी ...
२२ तारखेला शाळा बंद ठेवण्याचे आवाहन
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}