शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

राजकीय पदावर नसलो तरी जनसेवेसाठी कटिबद्ध राहिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 5:00 AM

शुक्रवारी सकाळी साईबाबांची पालखी निघाली. यावेळी पालखीच्या मार्गावर अनेक ठिकाणी अम्ब्रिशराव यांचे स्वागत करण्यात आले. काही व्यावसायिकांनी प्रतिष्ठानात त्यांना आमंत्रित करून त्यांच्या हाताने केक कापला. रात्रीच्या पारंपरिक पूजनानंतर राजमहाल परिसरात दसरा महोत्सवासाठी जमलेल्या नागरिकांना त्यांनी मार्गदर्शन केले. कोरोनामुळे सर्वांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली आणि सर्वांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

लाेकमत न्यूज नेटवर्कअहेरी : राजकीय पदावर असलो किंवा नसलो तरी या परिसरातील नागरिकांशी माझे नाते आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहीन, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले. कोरोनानंतर यावर्षी झालेल्या येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात ते बोलत होते.मागील वर्षी कोरोनाचा कहर असल्याने अहेरी इस्टेटचा दसरा मर्यादित स्वरूपात आणि साधेपणाने उरकावा लागला होता. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा दसरा महोत्सव यावर्षी मात्र उत्साहात झाला. राजे अम्ब्रिशराव यांचा वाढदिवस आणि दसरा असा एकत्र योग आल्याने नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. शुक्रवारी सकाळी साईबाबांची पालखी निघाली. यावेळी पालखीच्या मार्गावर अनेक ठिकाणी अम्ब्रिशराव यांचे स्वागत करण्यात आले. काही व्यावसायिकांनी प्रतिष्ठानात त्यांना आमंत्रित करून त्यांच्या हाताने केक कापला. रात्रीच्या पारंपरिक पूजनानंतर राजमहाल परिसरात दसरा महोत्सवासाठी जमलेल्या नागरिकांना त्यांनी मार्गदर्शन केले. कोरोनामुळे सर्वांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली आणि सर्वांना मोठे नुकसान सहन करावे लागले. लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनावर सर्वांनी मिळून मात करूया आणि कोरोना नावाच्या राक्षसाचा संहार करण्याचा पण घेऊया, असे आवाहन त्यांनी केले. 

२०१ किलोचा केकदसरा महोत्सवातील मार्गदर्शनानंतर मंचावर वाढदिवस साजरा करण्यात आला. नेत्रदीपक आतषबाजी, मंत्रोपचाराने महोत्सवाची रंगत वाढली. यावेळी तब्बल २०१ किलोचा भलामोठा केक कापण्यात आला. रात्रभर दसरा महोत्सवात पारंपरिक पद्धतीने आदिवासी नृत्यांचे सादरीकरण सुरू होते. यावेळी मंचावर राणी रुक्मिणीदेवी, कुमार रामेश्वररावबाबा, कुमार अवधेशरावबाबा, कुमार चित्तेश्वररावबाबा आणि कुमार प्रवीणरावबाबा तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिक आणि अहेरीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

 

टॅग्स :Dasaraदसरा