आलापल्ली : येथील मन्नेवार कॉलनीतील रहिवासी रमेश व्यंकटी रेड्डी यांचे घर रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने पूर्णत: कोसळले आहे. या घटनेमुळे रेड्डी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील असलेल्या रेड्डी यांचे घर कोसळल्याने ते पूर्णत: उघड्यावर आले असून शुक्रवारी घटनास्थळाला ग्रा. पं. सदस्य कैलास कोरेत, वासुदेव पेद्दीवार, आलापल्लीचे तलाठी ई. एस. चांदेकर यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांना तहसील कार्यालयाला अहवाल सादर केला. पंचनामा करताना रूपेश बंदेला, पवन तोगरवार, कन्नाके आदी उपस्थित होते. रेड्डी यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}