शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मुदतबाह्य औषधाचे वाटप

By admin | Updated: December 25, 2015 02:03 IST

येथून जवळच असलेल्या पाथरगोटा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना फिरते आरोग्य तपासणी पथकाकडून मुदतबाह्य ...

पाथरगोटा येथील प्रकार : औषधाचा बनला गोळा; रंगही बदललाजोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या पाथरगोटा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना फिरते आरोग्य तपासणी पथकाकडून मुदतबाह्य व आरोग्यास धोकादाय औषधाचे वितरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुदतबाह्य झालेल्या एकाच औषधाच्या वेगवेगळ्या बॉटलमधील औषधाचा रंग काळा, लाल, गुलाबी झाला आहे. यातील काही औषधांचा गोळाही तयार झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असून सदर औषधाचे वितरण करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्ग व नागरिकांनी केली आहे. आरमोरी तालुका फिरते आरोग्य तपासणी पथकाने २२ डिसेंबर रोजी पाथरगोटा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन येथील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. या जिल्हा परिषद शाळेत एकूण १४० विद्यार्थी शिक्षण घेत असून सर्वच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. १० ते २० विद्यार्थी सोडले तर सर्वच विद्यार्थ्यांना पॅरासिटामल या कंपनीच्या औषधीचे वितरण करण्यात आले. या औषधाच्या बॉटलवर मुदत संपण्याची तारीख डिसेंबर २०१५ अशी दर्शविण्यात आली आहे. म्हणजेच औपचारिकरित्या मुदत संपण्यासाठी आता केवळ पाच ते सहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. प्रत्यक्षात मात्र सदर औषध खराब झाले असल्याचे दिसून येते. एकाच बॅच नंबरच्या काही बॉटलमधील औषध काळे, लाल, गुलाबी अशा वेगवेगळ्या रंगाचे झाले आहेत. काही औषधीचा गोळा निर्माण झाला आहे. यावरून सदर औषध खराब झाले असल्याचे सर्वसामान्य नागरिकालाही लक्षात येते. मात्र ही बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कशी लक्षात आली नाही, असा प्रश्न पालकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे. काही पालकांनी औषधाची मुदत बघून आपल्या पाल्याला औषध घेण्यास मज्जाव केला. मात्र ज्या पाल्यांचे पालक अशिक्षित होते, त्या पाल्यांनी औषधाचे सेवन केले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना डोकेदुखी, उलटी हा त्रास जाणवायला लागला. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांच्या जीवनासोबत खेळ खेळणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला आहे. (वार्ताहर)