शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

निधी खर्च करण्यात सारेच आमदार ‘शेर’

By admin | Updated: July 23, 2014 23:37 IST

गडचिरोली या राज्यातील मागास व अतिदुर्गम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. या मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी आपल्या स्थानिक विकास निधीतून ६० टक्क्यापेक्षा अधिक निधी खर्च केला आहे.

गडचिरोली : गडचिरोली या राज्यातील मागास व अतिदुर्गम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. या मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी आपल्या स्थानिक विकास निधीतून ६० टक्क्यापेक्षा अधिक निधी खर्च केला आहे. या निधीतून अनेक गावांमध्ये विकासकामे करण्यात आली आहे. अहेरी या दुर्गम व अतिमागास विधानसभा मतदार संघात मागीलच पाच वर्षाच्या निधीतून ५७७ कामे करण्यात आले आहे. २००९-१० मध्ये ३२ लाख ३ हजार ११६ रूपयाचा निधी खर्च करण्यात आला. २०१०-११ मध्ये २ कोटी १५ लाख ६८०, २०११-१२ मध्ये १ कोटी ९४ लाख ८ हजार ४२८, २०१२-१३ मध्ये १ कोटी २५ लाख ६८ हजार, २०१३-१४ या वर्षात १ कोटी ८७ लाख ८ हजार ९० रूपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे. २००९-१० या वर्षांमध्ये आमदारांना १ कोटी ५० लाखाचा स्थानिक विकास निधी मंजूर करण्यात आला होता. तो २०१०-११ पासून २ कोटीचा झालेला आहे. मागील ५ वर्षाच्या कार्यकाळात अहेरी विधानसभा क्षेत्रात स्थानिक आमदारांनी ७ कोटी ५५ लाख ७९ हजार ६८ रूपयाचा निधी खर्च केलेला आहे. त्यांची निधी खर्च करण्याची कामगिरी जिल्ह्यात सर्वात सरस आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात वर्षाला आमदारांना मिळणारा २ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. हा निधी खर्च करताना दीडपट रक्कमेचे नियोजन करून काम सुचविण्यात आले. त्यामुळे गतवर्षीचे काम पुढील वर्षीही निधीतून पुर्णत्वास नेण्यात आले. त्यामुळे या मतदार संघात स्थानिक विकास निधीतून काम पूर्ण करण्यात आले. वर्ष २०१२-१३ मध्ये या मतदार संघात ६२.१० लाखातून ८ डांबरी रस्त्याचे काम, १५.० लाखातून ४ कच्च्या रस्त्याचे काम तर १ कोटी रूपयातून २४ सभामंडपाचे काम करण्यात आले. त्यावर्षी १ कोटी ७७ लाख १ हजार रूपयाच्या कामाचे नियोजन करण्यात आले होते. दरवर्षीच दीडपट नियोजनामुळे या मतदार संघात संपूर्ण निधी खर्च करण्यात आला आहे. यंदा मात्र १ कोटी ३० लाखाचाच निधी स्थानिक आमदारांच्या वाट्याला येणार आहे. त्यात ६२ लाखाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. तर ८२ लाखाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे, अशी माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली आहे.गडचिरोली विधानसभा मतदार संघात सन २००९-१० या वर्षात २ कोटी ९५ लाख ३० हजार रूपयातून ११ कामे करण्यात आले. २०१०-११ या वर्षात १ कोटी १५ लाख ५३ हजार रूपयाच्या निधीतून ८ कामे करण्यात आले. २०११-१२ या वर्षात २० कामे २ कोटी ८२ लाख ८७ हजाराचे काम मंजूर करण्यात आले होते. २०१२-१३ मध्ये १२ कोटी ५४ लाख ८८ हजार रूपयातून ८६ कामे मंजूर करण्यात आले आहेत. आमदारांना वार्षिक २ कोटी रूपयाचा निधी उपलब्ध होतो. मात्र दीडपट नियोजनाच्या पध्दतीनुसार या कामांचे नियोजन सर्वच लोकप्रतिनिधी करतात. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधींचा निधी पुढील वर्षी कामात खर्च होतो. गेल्या चार वर्षात गडचिरोली विधानसभा मतदार संघात १२५ कामांवर १९ कोटी ४८ लाख ५८ हजार रूपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे. अनेक गावांच्या पुढाऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे निधीची मागणी केल्यानंतर त्यांना तत्काळ पत्र दिले जाते. त्यामुळे हा निधी अनेक गावांना दिला जात आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)