शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्तपदांमुळे अहेरीचा कृषी उपविभाग पांगळा

By admin | Updated: July 13, 2015 01:46 IST

जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या अहेरी उपविभागातील चारही तालुका कृषी कार्यालयात अर्धेअधिक पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.

तब्बल ७० पदे रिक्त : शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष
रोमीत तोंबर्लावार आलापल्ली
जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या अहेरी उपविभागातील चारही तालुका कृषी कार्यालयात अर्धेअधिक पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल ७० पदे रिक्त असल्याने कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे. रिक्तपदांमुळे अहेरी कृषी उपविभाग पांगळा झाला असल्याचे दिसून येते.
अहेरी कृषी उपविभागाअंतर्गत अहेरी, सिरोंचा, भामरागड व एटापल्ली या चार तालुका कृषी कार्यालयांचा समावेश आहे. अहेरी तालुका कृषी कार्यालयात एकूण ३३ पदे मंजूर आहेत. यापैकी १६ पदे भरण्यात आले असून १७ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये तालुका कृषी अधिकारी वर्ग २, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आदी पदांचा समावेश आहे. सिरोंचा तालुका कृषी कार्यालयात एकूण ३३ पदे मंजूर आहेत. यापैकी १९ पदे भरण्यात आले असून १३ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भामरागड तालुका कृषी कार्यालयात एकूण ३३ पदे मंजूर आहेत. यापैकी १५ पदे भरण्यात आली असून १८ पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकारी पदांचा समावेश आहे. एटापल्ली तालुका कृषी कार्यालयात एकूण ५० पदे मंजूर आहेत. यापैकी ३० पदे भरण्यात आली असून २० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी वर्ग २, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक आदी पदांचा समावेश आहे.
चारही तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयात वर्ग १ च्या अधिकारीपदापासून लिपिक, शिपाई यासह सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत निम्म्याच कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. रिक्तपदे भरण्यासंदर्भात या भागातील नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा शासन व प्रशासनाकडे मागणी केली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तालुका कृषी कार्यालयातील पदे रिक्त आहेत.
अहेरी कृषी उपविभागाअंतर्गत अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या चारही तालुक्यातील कृषी कार्यालयात वर्ग २ च्या अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांची एकूण ७० पदे रिक्त असल्याची माहिती कृषी उपविभागाच्या वतीने शासन व विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना दिली आहे. तालुका कृषी कार्यालयात रिक्तपदे असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने सदर रिक्तपदे भरण्याची कार्यवाही करवी, असे कळविण्यात आल्याची माहिती कृषी उपविभाग कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
जिल्हास्तरावरील कृषी कार्यालयामार्फत बी-बियाणे, खते पुरवठा तसेच बैलबंडी वाटप, आॅईल इंजिन, सौरपंप, विद्युत पंप लाभाच्या योजना शेतकऱ्यांमार्फत राबविल्या जातात. उपविभाग व तालुकास्तरावर तालुका कृषी कार्यालयाच्या मार्फत सदर योजना राबविल्या जातात. मात्र अहेरी उपविभागातील चारही तालुका कृषी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची अर्धेअधिक पदे रिक्त असल्याने कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर याचा परिणाम होत आहे. रिक्तपदांमुळे या भागातील शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती मिळत नाही.