शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

‘श्री’ पद्धतीने धान लागवड करण्यावर कृषी विभागाचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 00:52 IST

‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड केल्यास उत्पादनात ५५ टक्के वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी धानाची श्री पद्धतीनेच लागवड करावी,

पाच हेक्टरचे उद्दिष्ट : उत्पादनात होते ५५ टक्के वाढगडचिरोली : ‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड केल्यास उत्पादनात ५५ टक्के वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी धानाची श्री पद्धतीनेच लागवड करावी, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. २०१६ च्या खरीप हंगामात किमान पाच हजार हेक्टरवर ‘श्री’ पद्धतीने लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हाभरात खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी एकट्या धानपिकाचा वाटा सुमारे दीड लाख हेक्टर आहे. शेतकरीवर्ग उत्पादन वाढीसाठी संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत असला तरी धान लागवडीची पद्धत मात्र पारंपरिक आहे. पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड करताना अगदी जवळ लागवड केली जाते व त्यामध्ये रोपांची संख्या अधिक राहते. दाटीने धान लागवड झाल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न होत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड ‘श्री’ पद्धतीने करावी, यासाठी राज्याच्या कृषी विभागाने प्रत्येक जिल्ह्याला निर्देश दिले आहेत. २०१५-१६ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत धान पिकासाठी प्रकल्प आधारित कार्यक्रम राबविण्यात आला होता. याअंतर्गत प्रत्येक कृषी सेवकाला निर्देश देऊन श्री पद्धतीने धानाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक मोठ्या गावी शिबिर घेऊन ‘श्री’ पद्धतीने धानाच्या लागवडीविषयी प्रसार, प्रचार करण्यात आला. परिणामी मागील वर्षी तीन हजार पेक्षा अधिक हेक्टरवर श्री पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली. यावर्षी पाच हजार पेक्षा अधिक हेक्टरवर श्री पद्धतीने धानपिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी विभाग कामाला लागला आहे. यांत्रिकीकरणामध्ये वाढ होत असल्याने श्री पद्धतीने धान लागवडीस प्रोत्साहन मिळत आहे. यावर्षीच्या हंगामात उद्दिष्ट गाठणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (नगर प्रतिनिधी)सिंचनाची सोय नसल्याने वाढली अडचणश्री पद्धतीने धानाची लागवड करताना प्रत्येक रोपटा एक ते दीड फूट अंतरावर लावला जातो. त्याचबरोबर या पद्धतीने रोवणी करताना धानाची रोवणी अगदी वेळेवर होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात फार कमी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. पाऊस लांबल्यास रोवणी लांबते. उशिरा रोवणी झाल्यास व श्री पद्धतीने लागवड झाल्यास पारंपरिक पद्धतीपेक्षाही उत्पादनात घट होण्याची शक्यता राहते. त्यामुळे श्री पद्धतीने उत्पादनात वाढ होते, हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असले तरी या पद्धतीने रोवणी करण्यास धजावत नाही.