शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

पावसानंतरही दुष्काळ कायम

By admin | Updated: September 11, 2014 23:32 IST

मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग काही प्रमाणात सुखावला असला तरी, महिनाभर पाऊस न पडल्याने धानपिकाचे झालेले नुकसान भरून निघणे शक्य नसल्याने

गडचिरोली : मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग काही प्रमाणात सुखावला असला तरी, महिनाभर पाऊस न पडल्याने धानपिकाचे झालेले नुकसान भरून निघणे शक्य नसल्याने पावसानंतरही जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती कायम आहे, असे भारतीय किसान संघाने म्हटले आहे.गडचिरोली जिल्ह्यात हलका मध्यम व जड या तीन प्रतिच्या धानाची लागवड करण्यात येते. हलका धान ११० ते १२० दिवसांत निघतो, मध्यम कालावधीचा धान १३० ते १४० दिवसांत निघतो तर जड धान १४५ ते १६० दिवसांत कापणीसाठी तयार होतो. जिल्ह्यात हलक्या व मध्यम प्रतिच्या धानाच्या सर्वाधिक लागवड करण्यात येते. सदर धान लवकर निघत असल्याने याची रोवणीसुद्धा लवकर होणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने या हलक्या व मध्यम धानाच्या रोवण्याचा कालावधी निघुन गेल्यानंतर रोवणी झाली आहे. हीच बाब काही प्रमाणात जड धानालाही लागू होते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात जरी पाऊस पडला असला तरी, धानपिकाचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कृषी विभागाच्या प्रयत्नानंतर जिल्ह्यात श्री पद्धतीने धानपिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत चालले आहे. श्री पद्धतीने धानाच्या रोपट्यांची लागवड १२ दिवसांच्या आतच करावी लागते. मात्र पऱ्हे टाकून २ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. नुकत्याच झालेल्या पावसानंतर धानाची रोवणी काही शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात जवळपास ५० हजार हेक्टरवर आवत्या पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात येते. आवत्यालाही एक महिन्याच्या आत बासी होणे आवश्यक आहे. मात्र पाऊसच नसल्याने बासी होऊ शकली नाही. त्यामुळे खत देणे किंवा धानपिकातील गवत काढण्याचे काम झाले नाही. त्यामुळेही धानपिकाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. रस्त्याने फेरफटका मारून दुष्काळाच्या परिस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व ‘आॅल ईज वेल’ असल्याचे दिसून येईल. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती याहून भिन्न आहे. उशिरा धानाची रोवणी झाली असल्याने धानपीक उशिरा निघणार आहे. तोपर्यंत तलाव, बोड्यांचे पाणी संपून कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उशिरा रोवणी झालेल्या पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना आगावू खर्च करावा लागणार आहे. या सर्व बाबींचा अंदाज घेतल्यास दुष्काळाचे सावट कायम असल्याने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भारतीय किसान संघाचे जिल्हामंत्री राजेश वाणी, अ‍ॅड. विलास भृगुवार, प्रेमानंद सोनटक्के, यादव भैसारे, उदय बोरावार यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)