शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा शिक्षकांचे समायोजन करा

By admin | Updated: June 20, 2016 01:13 IST

आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे इतरत्र समायोजन होईलपर्यंत त्यांना काम नाही,

शिक्षक संघटनेची मागणी : पगार नाकारणारा जीआर रद्द करा; पत्रकांची केली होळीअहेरी : आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे इतरत्र समायोजन होईलपर्यंत त्यांना काम नाही, वेतन नाही, असे धोरण ८ जून २०१६ च्या शासन निर्णयानुसार स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे सदर निर्णय रद्द करून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे इतरत्र समायोजन करून त्यांना वेतन द्यावे, या मागणीसाठी शनिवारी नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तांच्या कार्यालयासमोर शिक्षक भारती आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासन निर्णयाची होळी करण्यात आली. आश्रमशाळा न चालविल्यामुळे किंवा विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने आश्रमशाळा बंद पडतात. अशा कर्मचाऱ्यांचे आत्तापर्यंत इतरत्र समायोजन करून त्यांचे वेतन दिले जात होते. आश्रमशाळा बंद पडण्यामागे भौतिक सुविधा नसणे हे प्रमुख कारण आहे. इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण आदिवासी भागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे पहिली ते चौथीपर्यंत वर्ग बंद पडत असून मोठ्या प्रमाणात शिक्षक व कर्मचारी अतिरिक्त ठरत आहेत. त्यामुळे काम नाही, वेतन नाही, या धोरणामुळे कर्मचाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर निर्णय रद्द करून आश्रमशाळांचा दर्जा सुधारावा, समायोजित कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे, आश्रमशाळेतील विद्यार्थी संख्येची अट शिथील करावी, आश्रमशाळांचा दर्जा सुधारावा, अनुदानात वाढ करावी, आश्रमशाळेत इंग्रजी माध्यम, सेमी इंग्रजी वर्ग सुरू करावे या मागण्यांसाठी २५ जून रोजी आंदोलन करणार आहे, अशी माहिती शिक्षक भारती आश्रमशाळा संघटनेचे विभागीय अध्यक्ष महादेव बासनवार यांनी दिली आहे. आंदोलनात राजेंद्र झाडे, दिलीप तडस, संजय खेडीकर, आलबनकार, संतोष पेशट्टीवार व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)