शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींनी हक्क कायम ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 00:53 IST

आदिवासी बांधवांचे नैसर्गिक अधिकार हे प्रशासन धनदांडगे व कारखानदारांच्या घशात ओतत आहे.

अशोक श्रीमाली यांचे आवाहन : गडचिरोलीत आदिवासींची राज्यस्तरीय कार्यशाळागडचिरोली : आदिवासी बांधवांचे नैसर्गिक अधिकार हे प्रशासन धनदांडगे व कारखानदारांच्या घशात ओतत आहे. आदिवासींनी निमूटपणे बघ्याची भूमिका न घेता, स्वत:च्या हक्काचे संरक्षण करून आपले अधिकार व हक्क कायम ठेवण्यासाठी जागरूक झाले पाहिजे, असे आवाहन गुजरात येथील विचारवंत अशोक श्रीमाली यांनी केले.क्रांतिवीर बिरसा मुंडा व बाबुराव मडावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाज संस्था सप्ताहदरम्यान रविवारी आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन वर्धाचे आदिवासी सेवक महेंद्र शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच जीजाबाई अलाम, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, अ‍ॅड. सुखरंजन उसेंडी, पत्रकार रोहिदास राऊत, काँग्रेस कार्यकर्ते संतोष आत्राम, गोंडवाना गोंड महासभेचे शालिक मानकर, हलबी संघटनेचे कार्यकर्ते पितेश येरमे, सुखदेव शेडमाके, रामदास जराते, संतोष मडावी, कार्यक्रमाचे आयोजक कुसुम अलाम आदी उपस्थित होते. पुढे बोलताना अशोक श्रीमाली म्हणाले, शतकानुशतकापासून आदिवासींची पिळवणूक सुरूच आहे. समता, न्याय केवळ भाषणापूर्ते मर्यादित आहे. अन्यायाच्या विरोधात येथील आदिवासी लोकप्रतिनिधींनी कधीही आवाज उठविला नाही. त्यामुळे आदिवासींची पिळवणूक थांबली नाही. आदिवासींनी स्वत:च्या उत्थानाकरिता पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार शासनाकडे केवळ देखभालीचे अधिकार आहे. मात्र आदिवासींच्या वस्तूंवर शासन स्वामित्व गाजवतो. कारखानदार येथील आदिवासींचा खजिना लुटून नेत आहे. ही लूट थांबवायची असेल तर आदिवासींनी संघटीत होऊन लढा दिला पाहिजे, असे आवाहनही श्रीमाली यांनी यावेळी केले. महेश राऊत यांनी पेसा कायद्याअंतर्गत आदिवासींना मिळालेल्या अधिकाराची विस्तृतपणे माहिती दिली. कुसूम अलाम यांनी स्वातंत्र्यपूर्वीचे बिरसा मुंडा व स्वातंत्र्यनंतर समाज लढा उभारणारे बाबुराव मडावी, यांचा संघर्ष विशद केला. या दोन्ही क्रांतिकारकांचा संघर्ष आदिवासींपुढे न्यावा, असे आवाहन केले. यावेळी देवाजी कुलसंगे, मदन मडावी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गौरव अलाम, तुषार कुळमेथे, वृषभ धुर्वे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला गडचिरोली तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)