शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आसरअल्लीत आरोग्य समस्या तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 06:00 IST

असरअल्ली येथील आरोग्य पथकात गट ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पद रिक्त आहे. तसेच आरोग्य सेविका दोन, आरोग्य सेवक एक व परिचराचे दोन अशी सहा पदे रिक्त आहेत. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन सरपंच वैशाली सिडाम यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (पथक) ला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. आसरअल्ली ग्रामस्थांच्या वतीने सरपंच व सचिवांना वैद्यकीय अधिकारी नियुक्तीसाठी ठराव देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

ठळक मुद्देरुग्ण व नातेवाईक त्रस्त : आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकाऱ्यासह अनेक पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्याच्या असरअल्ली येथील प्राथमिक आरोग्य पथकात गट ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे असरअल्ली व अंकिसा परिसरात शासकीय आरोग्य सेवेची समस्या तीव्र झाली आहे. परिणामी रुग्ण व नातेवाईक त्रस्त झाले आहेत.असरअल्ली येथील आरोग्य पथकात गट ब च्या वैद्यकीय अधिकाºयांचे एक पद रिक्त आहे. तसेच आरोग्य सेविका दोन, आरोग्य सेवक एक व परिचराचे दोन अशी सहा पदे रिक्त आहेत. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन सरपंच वैशाली सिडाम यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (पथक) ला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. आसरअल्ली ग्रामस्थांच्या वतीने सरपंच व सचिवांना वैद्यकीय अधिकारी नियुक्तीसाठी ठराव देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, आसरअल्ली गावाची लोकसंख्या पाच हजारांवर असून आजुबाजूला अनेक खेडेगाव आहेत. शिवाय अतिदुर्गम भागही आहे. डेंग्यू, मलेरिया, काविळ, रक्त तपासणी, प्रसूती व इतर उपचाराकरिता खासगी डॉक्टरांकडे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जावे लागते. काही रुग्ण बाहेर गावच्या ठिकाणी असलेल्या खासगी डॉक्टरांकडे जातात. खासगी आरोग्य सेवा घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. गावात आरोग्य पथक असूनही परिपूर्ण व तातडीची आरोग्य सेवा मिळत नसल्याने आसरअल्ली भागातील नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती रोष आहे.सर्वसामान्य रुग्ण व नातेवाईकांची ही अडचण लक्षात घेऊन आसरअल्ली येथील प्राथमिक आरोग्य पथकात डॉक्टरची नियुक्ती करण्यात यावी, औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, गावासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी आदी मागण्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. जि.प.च्या आरोग्य विभागाने समस्या मार्गी लावण्याची मागणी आहे. निवेदनावर राजन्ना किष्टय्या वडलाकोंडा, रामूलू बोमय्या भिमकरी, राजेंद्र बापू उप्पुरपू, कोंडालरेड्डी नागरेड्डी गुडीमेटला आदींच्या स्वाक्षºया आहेत. निवेदन देताना श्रीरामलू नर्सय्या रोड्डा, प्रभाकर नर्सया रोड्डा, मधुकर पोचम रोड्डा, नागूलू बोल्ले, मोहनराजू गुडुरी, रवी गुडीमेटला, सदनपू बापू, बोरे धर्मय्या आदीसह नागरिक उपस्थित होते.सिरोंचाच्या ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभावसिरोंचा येथे ग्रामीण रुग्णालय आहे. संपूर्ण तालुक्यासह शेजारच्या तेलंगणा राज्यातील बरेच रुग्ण या रुग्णालयात औषधोपचारासाठी येतात. मात्र येथे वैद्यकीय अधिकारी, औषधसाठा, खाटांची कमतरता आदीसह विविध समस्या कायम असून आरोग्य सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे सदर रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक रुग्णांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात तसेच गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात रेफर केले जाते. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना सुविधा नसल्याचे कारण सांगून गडचिरोलीच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात रेफर केले जाते. परिणामी गडचिरोलीच्या महिला रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या महिला व बाल रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

टॅग्स :Healthआरोग्य